मुंबई : ग्रहांचा गोचर कालावधी वेगवेगळा असतो. अनेकदा एक ग्रह डोळ्यासमोर ठेवून त्याची फलितं सांगितलं जातात. पण इतर ग्रहांची स्थिती अनुकूल असेल तर त्याची फळं चांगली मिळतात. त्यामुळे या ग्रहाच्या गोचरात फायदा तर दुसऱ्या ग्रहाच्या गोचरामुळे प्रतिकूल फळं मिळतात. अशी स्थिती असताना सप्टेंबर महिन्यात ग्रहांमध्ये बरीच उलथापालथ होत आहे. गुरु, सूर्य, बुध, शुक्र, मंगळ या ग्रहांच्या स्थितीत बदल होत आहे. त्यामुळे बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहेत. 4 सप्टेंबरला शुक्र कर्क राशीत मार्गस्थ होणार आहे. त्याचबरोबर गुरु मेष राशीत वक्री होणार आहे. 16 सप्टेंबरपासून बुध सिंह राशीत पुन्हा एकदा सरळ मार्गाने जाताना दिसणार आहे. 24 सप्टेंबरला मंगळ ग्रह कन्या राशीत अस्त होणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. खासकरून तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
धनु : ग्रहांची उलथापालथ या राशीच्या पथ्यावर पडणार आहे. बऱ्याच सकारात्मक गोष्टी या कालावधीत होताना दिसतील. प्रगतीचे नवे मार्ग आपल्याला दिसून येतील. आत्मविश्वासात वाढ होईल. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या इच्छा पूर्ण होतील. आत्मविश्वास दुणावल्याने काही कामं झटपट पूर्ण करतील. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. या कालावधीत आर्थिक स्थिती मजबूत होईल.
मकर : या राशीच्या जातकांना शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. असं असताना पाच ग्रहांची स्थिती या राशीच्या जातकांना अनुकूल ठरेल. नोकरी करणाऱ्या जातकांना खासकरून सकारात्मक बदल दिसून येतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. काही लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या माध्यमातून किचकट कामं पूर्ण होतील. काही कामांसाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. पण त्याचा मोबदला कित्येक पटीने असेल. आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन : नुकतीच शनिच्या अडीचकीतून सुटका झाल्यानंतर ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. सध्या या राशीच्या जातकांचा सुवर्णकाळ सुरु आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. प्रॉपर्टीच्या कामातून अपेक्षित लाभ मिळेल. जमिनीचे व्यवहार तुमच्या माध्यमातून पूर्ण होतील. कुटुंबाला तुमच्याकडून खूपच अपेक्षा असतील. त्यांच्या इच्छा तुमच्या माध्यमातून पूर्ण होतील. आपल्या बोलण्याचे कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. तसेच आपली कामं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत राहा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)