वार्षिक राशी भविष्य
Image Credit source: TV9 Marathi
मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology 2023) ग्रहांचे संक्रमण खूप महत्वाचे मानले जाते. कारण जेव्हा ग्रह एका राशीतून बाहेर पडतात आणि दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात. यामध्ये असे दोन ग्रह आहेत ज्यांना वायू ग्रह म्हणतात. ते ग्रह राहू आणि केतू आहेत. हे दोन्ही ग्रह दीड वर्षातून एकदा राशी बदलतात आणि बहुतेक वेळा प्रतिगामी राहतात. 2023 मध्ये राहु 30 ऑक्टोबर रोजी मीन राशीत प्रवेश करेल आणि तोपर्यंत मेष राशीत राहील. या राशी बदलाचा सर्व राशींवर परिणाम होईल. पण अशा 5 राशी आहेत ज्यांना या काळात अनेक पटींनी लाभ मिळतील. चला जाणून घेऊया कोणत्या 5 राशींना राहु संक्रमणाचा फायदा होईल.
- मेष- 30 ऑक्टोबर रोजी जेव्हा राहू ग्रह मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यशाची संधी मिळेल. या राशीच्यालोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांनाही या काळात खूप फायदा होईल तसेच त्यांना आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ असेल.
- मिथुन- मिथुन राशीच्या लोकांसाठीही हे ग्रह संक्रमण लाभदायक ठरेल. त्यांना समाजात मान-सन्मान मिळेल आणि कार्यक्षेत्रात प्रगती होईल. मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. यासोबतच व्यवसायाच्या विस्तारासाठी हा काळ उत्तम राहील.
- कर्क- राहूच्या संक्रमणामुळे कर्क राशीच्या लोकांनाही खूप फायदा होईल. या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील आणि पैशाची कमतरता दूर होईल. मित्र आणि परस्पर परिचितांच्या मदतीने सर्व कामे पूर्ण होतील. त्यांना कामाच्या ठिकाणी यशही मिळेल आणि अचानक धनलाभ होण्याचे चांगले संकेत आहेत. यामुळे त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळेल.
- वृश्चिक- जेव्हा राहू ग्रह मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा वृश्चिक राशीच्या लोकांना अधिक लाभ होईल. त्यांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या काळात चांगला फायदा होईल. तसेच हा काळ गुंतवणुकीसाठी उत्तम असेल.
- मीन- वर्ष 2023 मध्ये मीन राशीच्या लोकांनाही या ग्रहसंक्रमणातून भरपूर लाभ मिळतील. या दरम्यान धनप्राप्तीची प्रबळ चिन्हे आहेत. नव्या क्षेत्रात सुरु केलेल्या कामामध्ये यश मिळेल. कुटुंबाशी संबंध सकारात्मक राहतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)