मुंबई : कोणत्याही ग्रहाने आपली राशी बदलली की शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होते. त्यात कोणता ग्रह कोणत्या राशीकडे नजर ठेवून आहे. तसेच कोणती दृष्टी आहे हे देखील महत्त्वाचं ठरतं. अशात 7 ऑगस्ट रोजी भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे कर्क राशीत शुक्र आणि सूर्याची युती तयार झाली आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे राजभंग राजयोग तयार झाला आहे. हा योग 17 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल. त्यानंतर सूर्यदेव कर्क राशीतील आपला कार्यकाळ पूर्ण करून सिंह राशीत प्रवेश करेल. राजभंग राजयोग काही राशींसाठी शुभकारक ठरणार आहे. यामुळे चार राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या चार राशी लकी ठरतील ते…
मेष : या राशीच्या चौथ्या स्थानात राजभंग राजयोग तयार झाला आहे. यामुले आई वडिलांकडून चांगली साथ मिळेल. वडिलोपार्जित जमिनीतून लाभ मिळेल. करिअरमध्ये काही शुभ योग पाहायला मिळतील. तीर्थयात्रेवर जाण्याचा योग जुळून येईल. त्याचबरोबर जीवनावर सकारात्मक प्रभाव दिसून येईल.
कर्क : या राशीत म्हणजेच लग्न राशीतच राजभंग राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या स्वभावात विशेष फरक दिसून येईल. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. प्रत्येक क्षेत्रात हवं तसं यश मिळताना दिसेल. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत कराल.
तूळ : या राशीच्या दशम स्थानात राजभंग राजयोग तयार होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं अर्थसंकट दूर होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत या काळात निर्माण होतील. तसेच नेतृत्व करण्याची संधी मिळेल. पदोन्नतीसोबत इंक्रीमेंट मिळू शकते.
धनु : या राशीच्या अष्टम स्थानात शुक्र आणि सूर्याची युती तयार होत आहे. या योगामुळे राजभंग राजयोग तयार होत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून चांगला लाभ मिळेल. उच्चपदस्थ लोकांच्या ओळखी होतील आणि त्याचा भविष्यात फायदा होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)