Astrology 2023 : वक्री गुरुमुळे तयार होणार ‘केंद्र त्रिकोण राजयोग’, तीन राशींच्या नशिबाचं दारं उघडणार

| Updated on: Jul 17, 2023 | 6:01 PM

ग्रहांच्या गोचरासोबत त्यांची वक्री अवस्थाही राशीचक्रावर परिणाम करत असते. शनिनंतर गुरु ग्रहही वक्री अवस्थेत जाणार आहे. त्यामुळे काही राशींच्या जातकांवर परिणाम दिसून येईल.

Astrology 2023 : वक्री गुरुमुळे तयार होणार ‘केंद्र त्रिकोण राजयोग’, तीन राशींच्या नशिबाचं दारं उघडणार
गुरू गोचर
Follow us on

मुंबई : राशीचक्रात गुरु आणि शनिचं महत्त्वाचं स्थान आहे. कारण या ग्रहांचा गोचर कालावधी मोठा आहे. सध्या शनि वक्री अवस्थेत आहे. तर सप्टेंबर महिन्यात गुरु वक्री होणार आहे. वक्री अवस्था म्हणजे उलटी चाल चालणं असा होतो. ज्योतिषशास्त्रात गुरु हा ग्रह समृद्धी, विवाह आणि अध्यात्माशी निगडीत आहे. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. गुरु ग्रह 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी वक्री होईल. गुरु ग्रह जवळपास 118 दिवस वक्री अवस्थेत असणार आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजून 9 मिनिटांनी मार्गी होईल. गुरुच्या या स्थितीमुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. गुरुच्या स्थितीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होईल. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना फायदा होईल.

या तीन राशीच्या जातकांना होईल फायदा

मेष : या राशीच्या जातकांना केंद्र त्रिकोण राजयोगाचा फायदा होईल. कारण गुरु ग्रह या राशीतच म्हणजेच लग्न भावात वक्री होणार आहे. त्यामुळे या जातकांच्या हाती पैसा खेळता राहील. नशिबाची चांगली साथ या काळात मिळेल. आत्मविश्वास दुणावलेला राहील आणि समाजमनावर चांगली छाप पडेल. नोकरी करणाऱ्या जातकांनाही सकारात्मक परिणाम दिसून येईल. काही आजारातून दिलासा मिळू शकतो. कामानिमित्त प्रवास करण्याचा योग जुळून येईल.

धनु : या राशीच्या पंचम भावात गुरु वक्री होणार आहे. यामुळे वाहन आणि संपत्ती खरेदीचा योग जुळून येईल. मुलांच्या बाबतीत शुभ बातमी कानावर पडू शकते. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरीच्या काही संधी चालून येतील त्यामुळे चांगले पर्याय उपलब्ध होतील. अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. या काळात काही मोठ्या व्यक्तींशी भेटीगाठी होतील.

कर्क : गुरु ग्रह या राशीच्या कर्मभावात वक्री होणार आहे. त्यामुळे कामात चांगली प्रगती दिसून येईल. नशिबाची साथ या काळात मिळेल. न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून असलेली अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होईल. समाजात मानसन्मान वाढेल. बेरोजगार असलेल्यांना नोकरीच्या ऑफर मिळेल. तसेच नोकरी करणाऱ्या जातकांचं प्रमोशन होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)