Astrology 2023 : तीन ग्रहांच्या गोचर कुंडलीतील स्थितीमुळे समसप्तक योगाची स्थिती, तीन राशींना होणार फायदा

| Updated on: Jul 12, 2023 | 5:02 PM

गोचर कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीमुळे राशीचक्रावर बराच परिणाम होत असतो. ग्रहांच्या प्रभावामुळे जीवनात अनेक बदल घडत असतात. दोन ग्रह एक दुसऱ्यापासून सप्तम भावात बसले असतात तेव्हा समसप्तक योग तयार होतो.

Astrology 2023 : तीन ग्रहांच्या गोचर कुंडलीतील स्थितीमुळे समसप्तक योगाची स्थिती, तीन राशींना होणार फायदा
Astrology 2023 : तीन ग्रह शुभ स्थितीत विराजमान, समसप्तक योगामुळे तीन राशींना मिळणार लाभ
Follow us on

मुंबई : राशीचक्रात घडणाऱ्या घडामोडींचा दैनंदिन जीवनावर प्रभाव पडत असतो. ग्रहांच्या गोचरामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होत असते. कोणता ग्रह कोणत्या राशीत बसला आहे आणि कितव्या स्थानावर बसला यावर अवलंबून असतं. सिंह राशीत सध्या दोन ग्रहांची युती झाली आहे. मंगळ आणि शुक्र हे दोन ग्रह सिंह राशीत विराजमान झाले आहेत. तर या राशीपासून सातव्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत शनिदेव भ्रमण करत आहेत. त्यामुळे ग्रहांच्या अशा स्थितीमुळे समसप्तक योग तयार झाला आहे. या योगामुळे अचानक धनलाभ किंवा नशिबाची जोरदार साथ मिळण्याची शक्यता आहे.

राशीचक्रात कशी असते ग्रहांची स्थिती

ज्योतिषीय नियमांनुसार, सर्व ग्रह स्थित असलेल्या ठिकाणाहून सातव्या स्थानावर पूर्ण नजर ठेवून असतात. दोन्ही ग्रह 180 डिग्रीत असतात. त्यामुळे त्याचा थेट प्रभाव दिसून येतो. शनि, मंगळ आणि शुक्राच्या अशा स्थितीमुळे काही राशीच्या जातकांना जबरदस्त फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या राशींबाबत

तीन राशीच्या जातकांना होईल फायदा

वृषभ : या राशीच्या चौथ्या स्थानात मंगळ आणि शुक्र बसले आहेत. तर दुसरीकडे दहाव्या स्थानात शनि आहे. त्यामुळे ग्रहांच्या अशा स्थितीमुळे कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम दिसून येतील. व्यवसायात प्रगती होताना दिसेल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. या काळात संपत्ती किंवा वाहन खरेदीचा योग जुळून येईल. वडिलोपार्जित जमीनीतून फायदा दर्शवत आहे.

मिथुन : मंगळ आणि शुक्र या राशीच्या तिसऱ्या स्थानात विराजमान आहेत. तर शनिची एकादश भावातून पूर्ण दृष्टी ठेवून आहेत. त्यामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात प्रवासाचा योग जुळून येईल. कामानिमित्त परदेशवारी घडू शकते. शेअर बाजार किंवा लॉटरी खरेदीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.

सिंह : याच राशीत मंगळ आणि शुक्राची युती झाली आहे. तसेच या राशीपासून सातव्या राशीत विराजमान असलेल्या शनिची पूर्ण दृष्टी असणार आहे. सातव्या स्थानात शनि असल्याने भागीदारीच्या व्यवसायातून चांगला लाभ मिळेल. लग्न झालेल्या व्यक्तींना पत्नीकडून साथ मिळेल. सासरच्या मंडळीकडून या काळात आर्थिक मदत होऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)