मुंबई : ज्योतिषशास्त्रात सर्वसमावेश अभ्यास करताना ग्रह राशींसोबत कोणत्या नक्षत्रात स्थित याचा अंदाज घेतला जातो. कारण त्या त्या नक्षत्र स्थितीवरही बरंच काही अवलंबून असंत. पंचांगानुसार, 27 नक्षत्र असून ग्रह ठराविक कालावधीनंतर नक्षत्र गोचर करत असतात. 9 ग्रह, 27 नक्षत्र आणि 12 राशी यांच्यात सर्व भविष्यशास्त्र बांधलं गेलं आहे. ग्रहांमध्ये राजाचा दर्जा असलेला सूर्यदेवाने पुष्य नक्षत्रात प्रवेश केला आहे. हे नक्षत्र गोचर खुपच महत्त्वाचं मानलं गेलं आहे. सूर्याने 20 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजून 8 मिनिटांनी पुष्य नक्षत्रात प्रवेश केला आहे.
पुष्य नक्षत्रावर गुरु आणि शनिचा अंमल आहे. त्यामुळे सूर्याने या नक्षत्रात ठाण मांडल्याने काही राशींसाठी हा काळ चांगला जाणार आहे. सूर्यदेव एका नक्षत्रात जवळपास 15 दिवस असतात दुसरीकडे, सूर्यदेव चंद्राचं स्वामित्व असलेल्या कर्क राशीत महिनाभर असणार आहे. कोणत्या राशींना लाभ मिळणार जाणून घ्या.
मेष : सूर्यदेव सध्या या राशीच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत आहे. त्यात आता पुष्य नक्षत्रात प्रवेश केल्याने सूर्यासोबत गुरुचीही कृपा होईल. आर्थिक कोंडी या काळात फुटेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. राजासारखं जीवन या काळात जगता येणार आहे. आपल्या कामामुळे इतरांवर प्रभाव पडेल.
मिथुन : या राशीच्या दुसऱ्या म्हणजेच धनभावात सूर्यदेव गोचर करत आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांना पैशांसंदर्भातील मार्ग मोकळे होतील. मालाची मागणी अचानक वाढेल आणि हातात पैसा खेळता राहील. कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील.
कर्क : सूर्य गोचर या राशीतच महिनाभरासाठी असणार आहे.त्यात पुष्य नक्षत्रात गोचर केल्याने जातकांना नशिब चांगलंच चमकणार आहे. राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या जातकांना अपेक्षित यश मिळेल. मोठा निर्णय या काळात होऊ शकतो.
धनु : सूर्यदेव या राशीच्या अष्टम भावात गोचर करत आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील. विनाकारण होणाऱ्या खर्चावर नियंत्रण बसेल. मित्रांकडून चांगली साथ मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)