Astrology 2023 : बुध आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होणार ‘लक्ष्मी नारायण योग’, या राशींना मिळणार पाठबळ

| Updated on: Aug 14, 2023 | 5:58 PM

ग्रहांच्या गोचरामुळे शुभ अशुभ योग तयार होत असतात. असाच एक शुभ बुध आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होत आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

Astrology 2023 : बुध आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशींना मिळणार पाठबळ
Astrology 2023 : बुध आणि शुक्राची युती तीन राशींना ठरणार फलदायी, लक्ष्मी नारायण योगाचा मिळणार लाभ
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती बरंच काही सांगून जाते. कोणता ग्रह कोणत्या राशीत स्थित आहे यावर भाकीत वर्तवलं जातं. सध्या सिंह राशीत ग्रहांची युती आघाडी पाहायला मिळत आहे. भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र आणि बुद्धिकारक ग्रह बुध यांची सिंह राशीत युती होणार आहे. या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. हा योग अत्यंत शुभ गणला जातो. या शुभ योगाचा राशीचक्रावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. त्यापैकी तीन राशीच्या जातकांना सर्वाधिक लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या तीन राशींना लाभ मिळणार ते

तीन राशींना लक्ष्मी नारायण योगाचा लाभ

धनु : या राशींसाठी लक्ष्मी नारायण योग फलदायी ठरणार आहे. कारण हा योग या राशीच्या भाग्य स्थानात तयार होत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जातकांना हा या योगांचा लाभ होणार आहे. अपेक्षित यश मिळू शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते. तसेच आत्मविश्वास दुणावलेला दिसून येईल. आनंदाची बातमी कानावर पडू शकते.

वृश्चिक : या राशीच्या लाभस्थानात लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. त्यामुळे काम आणि उद्योग व्यवसायात प्रगती दिसून येईल. बेरोजगार असलेल्या जातकांना नोकरीची संधी मिळेल. त्याचबरोबर गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तसेच नवीन आर्थिक स्रोत या कालावधीत निर्माण होतील. आर्थिक अडचण दूर झाल्याने आनंदी वातावरण असेल. कुटुंबासोबत देवदर्शनाला जाण्याचा योग जुळून येईल.

सिंह : या राशीत म्हणजेच लग्न भावात बुध आणि शु्क्राची युती होत आहे. यामुळे स्वभावात प्रचंड फरक दिसून येईल. आत्मविश्वासात वाढ होईल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. तुम्ही आखलेल्या योजना पूर्णत्वास जातील. त्याचबरोबर जोडीदारासोबत संबंध आणखी दृढ होतील. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. तसेच उत्पन्नात वाढ झाल्याचं दिसून येईल. पैसा हातात असल्याने योग्य ठिकाणी गुंतवा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)