मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहांची स्थिती महत्त्वाची असते. शुक्र ग्रह सुख वैभव, आरामदायी जीवन आणि भौतिक सुखांचा कारक आहे. त्यामुळे शुक्राची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. कुंडलीत शुक्राची कमकुवत असेल तर जातकाला त्रासाला सामोरं जावं लागतं. शुक्र ग्रह 23 जुलै 2023 रोजी सकाळी 6 वाजून 1 मिनिटानी सिंह राशीत वक्री होणार आहे. वक्री अवस्थेत असताना 16 दिवस अस्ताला जाणार आहे. 3 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजून 37 मिनिटांनी अस्ताला जाईल. त्यानंतर 7 ऑगस्ट 2023 रोजी वक्री अवस्थेत कर्क राशीत प्रवेश करेल. त्यामुळे त्याचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. शुक्राचा उदय 19 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 5 वाजून 21 मिनिटांनी होईल. यामुळे तीन राशींच्या जातकांना फटका बसेल.
मिथुन : शुक्र ग्रहाची वक्री चाल आणि अस्ताला जाणार असल्याने या राशीच्या जातकांना फटका बसेल. या राशीच्या धनभावात शुक्र अस्ताला जाणार आहे. त्यामुळे या काळात धनहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच आपल्याकडून बोलताना कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. नातेवाईकांसोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतो. जोडीदारासोबत काही कारणावरून मतभेद होऊ शकतो.
धनु : या राशीच्या अष्टम भावात शुक्र अस्ताला जात आहे. या काळात एखादा आजार बळावू शकतो. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. आजारपणावर पैसा खर्च होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्ती आजारी पडल्याने रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागू शकतात. समाजात मानसन्मान मिळणं कमी होईल. अपकिर्तीला सामोरं जावं लागेल. या काळात दुर्घटना होऊ शकते. त्यामळे वाहन जरा जपून चालवा.
तूळ : शुक्र ग्रह अस्ताला जाणार असल्याने जातकांना फटका बसेल. या राशीच्या दशम स्थानात शुक्र ग्रह अस्ताला जाणार आहे. त्यामुळे व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात एखादा निर्णय अंगलट येऊ शकतो. त्यामुळे योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन काम करा. राजकारणापासून दूर राहा. गुंतवणुकीतून हवं तसं उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे धीर धरा आणि गरज असेल तरच पैसा काढा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)