मुंबई : नववर्ष 2024 मधील जानेवारी महिना ग्रहांच्या दृष्टीने कसा जाईल यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. कोणता ग्रह कोणत्या स्थानात बसला आहे आणि कसं फळ देईल याबाबत गणित मांडलं जात आहे. जानेवारी महिन्यात गुरु, शनि, राहु-केतु आणि मंगळ हे ग्रह काही राशी बदल करणार नाहीत. त्यामुळे आता ज्या राशीत विराजमान आहेत. त्याच राशीत ठाण मांडून बसणार आहे. पण इतर ग्रहांच्या सान्निध्यात आल्याने शुभ अशुभ योगाची स्थिती निर्माण होणार आहे. या महिन्यात सूर्य एकदा, बुध एकदा, शुक्र एकदा, तर चंद्र 13 वेळा राशी बदल करणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर त्या त्या ग्रहाच्या गोचरानंतर परिणाम दिसून येईल. चंद्राची स्थिती दर सव्वा दोन दिवसांनी बदलत राहणार आहे. त्यानंतर बुध ग्रहाच्या स्थितीत बदल होणार आहे.
बुध ग्रह 7 जानेवारीला वृश्चिक मधून धनु राशीत प्रवेश करेल. रात्री 9 वाजून 16 मिनिटांनी हा प्रवेश असेल. 1 फेब्रुवारीपर्यंत यात राशीत राहील. याच दिवशी दुपारी 2 वाजून 23 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल.
15 जानेवारी सूर्य ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. पहाटे 2 वाजून 43 मिनिटांनी हा बदल होईल.
शुक्र ग्रह सध्या वृश्चिक राशीत आहे. 18 जानेवारी 2024 रोजी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. रात्री 8.56 मिनिटांनी हा प्रवेश होईल. 12 फेब्रुवारीपर्यंत शुक्र या राशीत विराजमान राहील.
गुरु, शनि, राहु आणि केतु या ग्रहांचं गोचर या वर्षात नाही. शनिदेव सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. शनिच्या स्थितीत काळानुरूप बदल होत राहतील. 2025 वर्षात शनिदेव मीन राशीत प्रवेश करतील. राहु ग्रह मीन राशीत असून दीड वर्ष याच राशीत असणार आहे. केतु ग्रह कन्या राशीत असून याच राशीत दीड वर्षे असणार आहे. गुरु ग्रह मे 2024 पर्यंत मेष राशीत असणार आहे.
चंद्र जानेवारी महिन्यात 13 वेळा राशीबदल करणार आहे. चंद्राच्या गोचरासोबत शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होईल. वर्षाच्या सुरुवातीला चंद्र सिंह राशीत होता.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)