मुंबई : शनिनंतर सर्वाधिक भीती असणारा ग्रह म्हणजे राहु. कारण राहु मायावी असून मृगजळाच्या मागे धावण्यास प्रवृत्त करतो. मात्र सरतेशेवटी हाती काहीच लागत नाही. या प्रवासात जातकाला बरंच काही गमवावं लागतं. त्यामुळे कुंडलीत राहुची स्थिती कशी आहे याकडे ज्योतिष बारकाईने पाहतात. गोचर कुंडलीत राहु दीड वर्षानंतर राशी बदल करतो. मात्र एका ठरावीक कालावधीनंतर नक्षत्र बदल करतो. त्याचा प्रभाव राशीचक्रावर त्या त्या स्थानावरून होत असतो. सध्या दीड वर्षांसाठी राहु मीन राशीत ठाण मांडून बसला आहे. पण राहुने आता रेवती नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश केला आहे. रेवती नक्षत्राचा स्वामी ग्रह बुद्धिदाता बुध ग्रह आहे. नक्षत्र साखळीत रेवती नक्षत्र सर्वात शेवटचं नक्षत्र आहे. त्यामुळे राहुच्या गोचराने राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. खासकरून तीन राशींच्या जातकांना गोचराचा लाभ मिळणार आहे.
मेष : या राशीच्या द्वादश स्थानात राहु सध्या आहे. त्यामुळे राहुच्या नक्षत्र गोचराचा लाभ या राशीच्या जातकांना होईल. काही सकारात्मक घडामोडी घडतील. अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनातील काही अडचणी दूर होतील. राहुचं बळ एका अर्थाने मिळेल. त्यामुळे किचकट कामातही यश मिळू शकते. या कालावधीत जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
मिथुन : या राशीच्या दशम स्थानात राहु सध्या आहे. पण नक्षत्र गोचरामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. लॉटरी किंवा शेअर बाजारातून धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल.उत्पन्नाचे नवे स्रोत या कालावधीत निर्माण होतील. समाजात मानसन्मान वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित करा. कौटुंबिक पातळीवर चांगलं वातावरण असेल.
कन्या : राहु या राशीच्या सातव्या स्थानात आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. पण इतर बाबतीत राहुची साथ मिळेल. ठरल्याप्रमाणे काही घडामोडी व्यवसायात होतील. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. मोठी जबाबदारी खांद्यावर पडेल आणि ती व्यवस्थितरित्या पार पाडाल. त्यामुळे वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर असेल. तुमचा शब्द खाली पडू दिला जाणार नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)