ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं आणि त्याच्या स्वभावाचं एक महत्त्व आहे. काही ग्रहांचं एकमेकांशी पटतं, तर काही ग्रह एकमेकांचा वारा देखील लागू देत नाही. त्याचे थोड्या अधिक प्रमाणात जातकांवर परिणाम होत असतात. त्यामुळे ग्रहांची दिशा बदलली लगेचच त्याचे परिणाम राशीचक्रावर दिसून येतात. प्रत्येक राशीत चार चरणात ग्रहांची स्थिती असते. त्याला अंशात्मक स्थिती असंही म्हंटलं जातं. ग्रह त्या राशीत किती अंशात विराजमान आहे हे देखील महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे ग्रहांची शुभ अशुभ फळं जातकांना भोगावी लागतात. आता राशीचक्रात एक महत्त्वाचा बदल होणार आहे. तो म्हणजे शुक्र आणि मंगळ यांच्या षडाष्टक योग तयार होणार आहे. द्रिक पंचांगानुसार, 14 नोव्हेंबरला शुक्र मकर राशीत असणार आहे. तर मंगळ सिंह राशीत विराजमान असणार आहे. त्यामुळे दोन्ही ग्रहांमध्ये षडाष्टक योग तयार होणार आहे. यामुळे तीन राशींच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
वृषभ : ही शुक्राची स्वरास असून या राशीत मंगळ तिसऱ्या आणि शुक्र आठव्या स्थानात बसणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. तसेच व्यवसायात अपेक्षित उत्पन्न मिळेल. आर्थिक स्थितीही या काळात मजबूत होईल.
मकर : या राशीच्या जातकांचा शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे. दुसरीकडे, मंगळ आणि शुक्राची कृपा राहील. कौटुंबिक पातळीवर चांगला पाठिंबा मिळेल. त्यामुळे मोठ्यातली मोठी जबाबदारी पार पाडू शकता. करिअरमध्ये एक उंची गाठाल. तसेच गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील.
कन्या : या राशीच्या जातकांना शुक्र मंगळ षडाष्टक योग लाभदायी ठरेल. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळू शकतो. नोकरीत मोठ्या पदाची आणि पगाराची नोकरी चालून येईल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. आरोग्य विषयक तक्रारी दूर होण्याची दाट शक्यता आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)