Astrology 2025 : शनिनंतर राहु-केतुही नववर्षात करणार राशी बदल, या तीन राशींना मिळणार नशिबाची साथ

| Updated on: Nov 15, 2024 | 4:29 PM

नववर्ष 2025 मध्ये ग्रहांची उलथापालथ होणार आहे. मुख्य म्हणजे शनिसह राहु-केतु आणि गुरु ग्रह राशी बदलणार आहे. त्यामुळे 2025 हे वर्ष ज्योतिषशास्त्राच्या तुलनते महत्त्वाचं आहे. खासकरून पापग्रह असलेले राहु-केतुही राशी बदल करणार आहेत. त्यामुळे तीन राशींच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

Astrology 2025 : शनिनंतर राहु-केतुही नववर्षात करणार राशी बदल, या तीन राशींना मिळणार नशिबाची साथ
Follow us on

नववर्ष 2025 सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येक जण नव संकल्पांसह नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. असं असताना ग्रहांच्या दृष्टीनेही नववर्ष महत्त्वाचं आहे. कारण नवग्रह या वर्षात बदल करणार आहे. कारण शनिचा अडीच वर्षांचा कालावधी आणि राहु-केतुचा दीड वर्षांचा कालावधी याच वर्षात संपत आहे. त्यात गुरु दरवर्षी राशीबदल करतो. त्यामुळे सर्वच ग्रह राशी बदल करणार असल्याने ज्योतिष्यांचं लक्ष लागून आहे. सात ग्रह हे सरळमार्गी गोचर करतात. तर राहु-केतु हे उलटमार्गी प्रवास करतात. त्यामुळे या दोन ग्रहांच्या स्थितीमुळे बरेच शुभ अशुभ योग तयार होणार आहेत. 18 महिन्यानंतर राहु आणि केतु हे राशीबदल करणार आहेत. राहु मीन राशीतून कुंभ राशीत, तर केतु कन्या राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही एकाच दिवशी बदल करतात आणि कायम समोरासमोर असतात. 18 मे 2025 रोजी संध्याकाळी 4.30 वाजता राशी बदल होणार आहे. यामुळे काही राशींना सावध राहणं गरजेचं आहे. तर राशींचं नशिब चमकू शकतं. तीन राशीच्या जातकांना 2025 हे वर्ष मस्त जाईल.

या तीन राशींना होईल लाभ

मिथुन : या राशीच्या नवव्या स्थानात राहु आणि तिसऱ्या स्थानात केतु असेल. गोचर कुंडलीनुसार या स्थितीमुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं या कालावधीत पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना लाभ मिळेल. कुळाचार करण्याचा योग या कालावधीत जुळून येईल. त्यामुळे कामांना आणखी गती मिळेल.

मकर : या राशीच्या जातकांची साडेसाती 2025 मध्ये संपत आहे. त्यात राहु आणि केतुची स्थिती लाभदायी ठरेल. राहु तिसऱ्या आणि केतु आठव्या स्थानात असणार आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या धनलाभ होऊ शकतो. आरोग्यविषयक तक्रारी या कालावधीत दूर होतील. घरातील भांडणं मिटल्याने मानसिक समाधान लाभेल.

धनु : या राशीच्या चौथ्या स्थानात राहु आणि नवव्या स्थानात केतु असणार आहे. त्यामुळे नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे. राहु दिलं तर भरभरून देतो. त्यामुळे नव वर्ष या राशीच्या जातकांना उत्तम जाणार आहे. पण या कालावधीत विनाकारण खर्च करणं टाळा. कुळाचार केला नसेल तर करून घ्या. यामुळे तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)