ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. कोणताच ग्रह शुभ किंवा अशुभ नसतो. पण ग्रहांच्या स्थितीत कोणता ग्रह कोणत्या स्थानात बसला आणि कशी फळं देतो यावर अवलंबून आहे. त्यात काही ग्रहांची स्थिती जातकांच्या कुंडलीत चांगली असली की भौतिक सुखं मिळतात. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला भौतिक सुखांचा कारक मानलं गेलं आहे. हा ग्रह एखाद्या राशीत महिनाभर राहतो. त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. वक्री स्थितीत एखाद्या राशीत ठाण मांडण्याचा अवधी वाढतो देखील.. सध्या शुक्र ग्रह हा मकर राशीत विराजमान आहे. 28 डिसेंबरला शुक्र ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनिदेव आहेत. त्यात शनि आणि शुक्राचं एकमेकांशी पटतं. त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण राशीचक्रावर दिसून येईल. खासकरून तीन राशींना या स्थितीचा लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात त्या राशींबाबत
मिथुन : या राशीच्या जातकांना शुक्राची स्थिती लाभदायक ठरणार आहे. कारण शुक्र ग्रह या राशीच्या भाग्यस्थानात असणार आहे. त्यामुळे या कालावधीत जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सामाजिक कार्यात आवड निर्माण होईल. तसेच दान धर्मासारखी पुण्य कर्म हातून घडतील. धार्मिक तसेच मंगळ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्थितीचा लाभ मिळेल.
मेष : या राशीच्या उत्पन्न आणि लाभ स्थानात शुक्र ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे या कालावधीत उत्पन्नात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना हा कालावधी चांगला जाईल. तुम्हाला एखादं मोठं पद मिळू शकतं. व्यवसायिक पातळीवर जातकांना मोठी ऑर्डर मिळू शकते. तसेच गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागतील. शेअर बाजार, लॉटरीतून चांगला लाभ मिळेल.
वृषभ : या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यात शुक्र ग्रह कर्म स्थानात गोचर करणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना या काळात नवीन संधी मिळेल. कौटुंबिक पातळीवरील काही समस्या दूर होतील. लग्नातील बाधा दूर होतील आणि स्थळं चालून येतील. समाजात मानसन्मान वाढेल. तसेच अचानकपणे धनलाभ होऊ शकतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)