मुंबई : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह आणि त्यांच्याशी संबंधित रत्नांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. रत्न व्यक्तीचे नशीब बदलण्याचे काम करतात. काही लोक छंद म्हणून कोणतेही रत्न घालतात, परंतु असे करणे चुकीचे आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, राशीनुसार रत्न धारण केले पाहिजे. कोणताही सल्ला न घेता रत्न धारण केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार नीलम रत्न (Nilam Stone Benefits) शनि ग्रहाशी संबंधित आहे. नीलम रत्न धारण केल्याने एखादा रंकही राजा बनू शकतो. नीलम रत्न धारण करण्याचे कोणते फायदे आणि तोटे आहेत ते आपण जाणून घेऊया.
मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी निळा नीलम रत्न शुभ आहे. या दोन्ही राशींचा शासक ग्रह शनि आहे. जर पत्रिकेत शनि दुर्बल असेल तर निळा नीलम रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. या रत्नासोबत कोरल, माणिक किंवा मोती नीलमणी घालू नयेत.
नीलम रत्न धारण केल्यास रत्नापासून व्यक्तीला आर्थिक आणि मानसिक फायदा होतो. करिअर किंवा व्यवसायात यश मिळेल. ज्या लोकांना नैराश्याच्या समस्येने ग्रासले आहे त्यांच्यासाठी नीलम रत्न फायदेशीर आहे. हे रत्न धारण केल्याने विचार करण्याची क्षमता विकसित होते.
जर नीलम रत्न फायदेशीर नसेल तर ते धारण केल्याने डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. व्यक्तीला डोकेदुखी आणि अस्वस्थता सुरू होईल. अपघाताचा धोका संभवतो. जर नीलम तुमच्या राशीसाठी योग्य नसेल तर घर, व्यवसाय आणि जीवनात नुकसान होऊ शकते.
रत्न तज्ञांच्या मते, नीलम तुमच्यासाठी शुभ आहे की नाही हे तुम्ही घरी बसूनच शोधू शकता. यासाठी 5 कॅरेटचा नीलम रत्न निळ्या कपड्यात बांधा. मग झोपण्यापूर्वी उशीखाली ठेवा. जर तुम्हाला रात्री चांगली स्वप्ने पडत असतील तर याचा अर्थ हे रत्न तुमच्यासाठी चांगले आहे. जर तुम्हाला भयानक स्वप्ने पडत असतील तर नीलम तुम्हाला नकारात्मक परिणाम देईल. कोणताही रत्न हा उर्जेचा स्त्रोत तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे काम करतो. रत्न शास्त्रात दिलेले रत्न कोणकोणत्या ग्रहाचे प्रतिनिधीत्व करते. त्यामुळे तुमच्या पत्रिकेत कोणता ग्रह दूर्बल आहे त्यानुसार रत्न धारण केल्या जातो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)