मुंबई, ज्योतिषशास्त्रातील (Astrology) कुंडली, अंकशास्त्रातील जन्मतारीख पाहून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी अनेक माहिती मिळू शकते. त्याचबरोबर समुद्रशास्त्रालाही खूप महत्त्व आहे. समुद्र शास्त्रामध्ये हाताच्या रेषा आणि शरीराची ठेवणं यावरून व्यक्तीचे भविष्य सांगता येते. आज आम्ही तुम्हाला अशा हस्तरेषांबद्दल सांगणार आहोत, ज्या खूप भाग्यशाली मानल्या जातात. या रेषा असण्याचा अर्थ असा होतो की, व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तो अतिशय विलासी जीवन जगतो.
शनी पर्वत जर हाताच्या खालच्या बाजूने एखादी रेषा निघून थेट शनी पर्वतावर पोहोचली तर अशा व्यक्तीला त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीचा खूप फायदा होतो. याउलट, जर जीवनरेषेतून एखादी रेषा उठून शनी पर्वतावर पोहोचते, तर अशी व्यक्ती स्वतःच संपत्ती निर्माण करते.
शनी पर्वत हातावर असणे खूप महत्त्वाचे आहे. शनी पर्वताला भाग्याचे स्थान देखील मानले जाते. शनि पर्वतावरील रेषा गाठणे म्हणजे अशा व्यक्तीला आयुष्यात कधीही अन्न-धान्याची कमतरता भासत नाही. तसेच अशा व्यक्तीला आयुष्यात कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही.
जर जीवनरेषेपासून उदयाची रेषा आतमध्ये येऊन मंगळाच्या पर्वतापर्यंत पोहोचली तर ती खूप शुभ मानली जाते. जर चंद्राच्या पर्वतावरून एखादी रेषा निघून शनि पर्वतावर पोहोचली तर अशा व्यक्तीचे भाग्य तेव्हाच उजळते जेव्हा तो घरापासून दूर असतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)