मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या युती आघाडी होत असते. कधी कधी एका राशीत काही 50 ते 60 वर्षांनी एकदा येतात. कारण प्रत्येक गोचराचं गणित वेगळं असतं. असाच एक दुर्मिळ योग 700 वर्षानंतर जुळून आला आहे. ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे 5 राजयोग जुळून आले आहेत. यात योग केदा, हंस, मालव्य, चतुष्चक्र आणि महाभाग्य योगाचा समावेश आहे. ग्रहांची ही स्थिती चार राशींसाठी अनुकूल आहे. यामुळे चार राशीच्या लोकांना धनलाभ, प्रतिष्ठा आणि मानसन्मान मिळेल. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या आहे.
कर्क – ग्रहांच्या गोचरामुळे या राशीच्या कुंडलीत हंस आणि मालव्य हा शुभ योग तयार होत आहे. कारण शुक्र आणि गुरु या राशीच्या भाग्य स्थानात मार्गस्थ आहेत. यामुळे नशिबाची चांगली साथ मिळेल. तुम्ही ज्या नोकरीच्या नोकरीच्या शोधात आहात, ती नोकरी तुमच्यापर्यंत चालून येईल. भौतिक सुखांचा आनंद या काळात उपभोगता येईल. कामानिमित्त विदेश दौरा होण्याची शक्यता आहे. तसेच कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा काळ अनुकूल असेल.
कन्या- या राशीच्या लोकांसाठी पाच राजयोग चांगले दिवस खेचून आणतील. या राशीच्या सप्तम भावात मालव्य राजयोग जुळून आला आहे. सातवं स्थान हे जोडीदाराशी निगडीत असतं. त्यामुळे कौटुंबिक वातावरण एकदम मस्त असेल. भागीदारीच्या व्यवसायात तुम्हाला उत्तम फायदा दर्शवत आहे. अविवाहित लोकांचे या काळात लग्न जमू शकते. तसेच आर्थिक गणित या काळात अधिक सक्षम होईल.
मिथुन – गुरु आणि शुक्र या राशीच्या गोचर कुंडलीतील कर्म भावात विराजमान आहे. यामुळे राशीच्या गोचर कुंडलीत हंस राजयोग तयार होत आहे. नोकरदार वर्गाला या काळात चांगली संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. तसेच पदोन्नती होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायिकांना या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक गणित सुधारल्याने घरातील वातावरणही आनंदी असेल.
मीन – या राशीच्या जातकांना हंस आणि मालव्य राजयोग फलदायी ठरेल. या योगामुळे आत्मविश्वास द्विगणित झालेला असेल. त्यामुळे साहस आणि पराक्रमात बदल दिसून येईल. ज्या कामात हात टाकाल त्या कामात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी बॉसकडून कौतुकाची छाप पडेल. पण असं असलं तरी साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे, हे मात्र विसरू नका. त्यामुळे आरोग्यविषयक तक्रारींकडे लक्ष ठेवा.