Astrology: राहू-मंगळाचा अंगारक योग, कोणत्या राशीवर काय होणार परिणाम
राहू-केतू (Rahu Ketu) हे शनी नंतरचे सर्वात हळू मार्गक्रमण करणारे ग्रह आहेत, एका राशीत त्यांचे दीड वर्ष वास्तव्य असते. यावर्षी 12 एप्रिल 2022 रोजी राहूने मेष राशीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर मंगळानेही जूनमध्ये मेष राशीत प्रवेश केला आहे. अशा स्थितीत राहु आणि मंगळ हे मेष राशीत आहेत, ज्यामुळे अंगारक योग तयार होतो. अंगारक योग ज्योतिषशास्त्रात […]
राहू-केतू (Rahu Ketu) हे शनी नंतरचे सर्वात हळू मार्गक्रमण करणारे ग्रह आहेत, एका राशीत त्यांचे दीड वर्ष वास्तव्य असते. यावर्षी 12 एप्रिल 2022 रोजी राहूने मेष राशीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर मंगळानेही जूनमध्ये मेष राशीत प्रवेश केला आहे. अशा स्थितीत राहु आणि मंगळ हे मेष राशीत आहेत, ज्यामुळे अंगारक योग तयार होतो. अंगारक योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानला जात नाही. मात्र आगामी काळात हा योग अधिक धोकादायक ठरू शकतो.
मेष राशीत राहू आणि मंगळ जवळ येत असल्याने अंगारक योगाचे बळ वाढत आहे. 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान, जेव्हा राहू मेष राशीमध्ये 24.7 अंशांवर आणि मंगळ 24 अंशांवर जाईल, तेव्हा राहू-मंगळाच्या संयोगासाठी सर्वात कठीण काळ असेल. यानंतर मंगळ 11 ऑगस्ट 2022 रोजी मेष राशीतून निघेल. पण हे 4 दिवस काही लोकांसाठी खूप कठीण जाणार आहेत. या लोकांना त्यांची ऊर्जा नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे.
अंगारक योग या राशींना त्रास देईल
- मेष– मेष राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावे. विनम्र व्हा नाहीतर अडचणीत येऊ शकता. भांडणे टाळा. दुखापत होऊ शकते. उच्च बीपी-मायग्रेन असलेल्या रुग्णांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
- तूळ– वैवाहिक जीवनात त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत चुकूनही वाद घालू नका. पोटात समस्या असू शकते. साधे अन्न खा.
- वृषभ– अपघात होण्याची शक्यता आहे. या 4 दिवसात काळजी घ्या. प्रत्येक बाबतीत संयमाने काम करणे चांगले.
- मिथुन– मिथुन राशीच्या लोकांनी भावासोबत वाद घालू नये. अन्यथा संबंध बिघडू शकतात. हाताला दुखापत होण्याची शक्यता आहे.
- कर्क– कर्क राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा. विशेषतः कामाच्या ठिकाणी अजिबात रागावू नका.