Astrology: ‘या’ राशींच्या लोकांसाठी अनिष्ट काळ; राहू मंगळाच्या युतीने बनतोय अंगारकी योग
ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) ग्रहांचे संक्रमण, ग्रहांच्या हालचालीतील बदल, ग्रहांच्या संयोगाचे परिणाम देखील सांगितले आहेत. ग्रहांच्या संयोगाने अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. या योगांचा राशींवर मोठा प्रभाव पडतो. यावेळी मंगळ आणि राहू हे ग्रह एकत्र येणार आहेत. अत्यंत प्रबळ ग्रह मंगळाची सावली राहु ग्रहासोबत अंगारकी योग (Angaraki yog) तयार करेल. ही परिस्थिती काही राशींसाठी त्रासदायक […]
ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) ग्रहांचे संक्रमण, ग्रहांच्या हालचालीतील बदल, ग्रहांच्या संयोगाचे परिणाम देखील सांगितले आहेत. ग्रहांच्या संयोगाने अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. या योगांचा राशींवर मोठा प्रभाव पडतो. यावेळी मंगळ आणि राहू हे ग्रह एकत्र येणार आहेत. अत्यंत प्रबळ ग्रह मंगळाची सावली राहु ग्रहासोबत अंगारकी योग (Angaraki yog) तयार करेल. ही परिस्थिती काही राशींसाठी त्रासदायक ठरू शकते. 27 जून रोजी मंगळ मेष राशीत प्रवेश केल्यावर अंगारक योग तयार होईल, कारण राहु येथे आधीच उपस्थित आहे. राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांवर याचा प्रभाव जास्त दिसून येईल. मंगळ आणि राहू ग्रहाची युती 3 राशीच्या लोकांसाठी अशुभ आहे. मंगळ-राहूच्या संयोगाने तयार झालेला अंगारक योग या राशींना अडचणी देईल.
या लोकांना जड जाईल अंगारकी योग
- वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळ-राहू युती चांगली नाही. त्याचा परिणाम त्यांच्या खिशावर होणार आहे. या राशीच्या लोकांचा खर्च वाढेल, ज्यामुळे बजेट बिघडू शकते. त्याचबरोबर भावंडांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे हा वेळ शांततेत घालवा आणि कटू बोलणे टाळा. व्यापार्यांनी यावेळी मोठे व्यवहार करणे टाळावे. हितशत्रूंमुळे नुकसान होऊ शकते. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करावे.
- सिंह: अंगारक योगामुळे सिंह राशीच्या लोकांना दुर्दैवाचा सामना करावा लागू शकतो. केलेले कोणतेही काम बिघडू शकते. लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या योजना रद्द कराव्या लागतील. व्यापाऱ्यांचे मोठे सौदे रद्द होऊ शकतात. वाहन काळजीपूर्वक चालवा. आरोग्याची काळजी घ्या. पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. देवाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यामुळे अनिष्ठ प्रभावापासून संरक्षण होईल.
- तूळ: मंगळ-राहू युती तूळ राशीच्या लोकांसाठी प्रेम जीवनात समस्या निर्माण करू शकते. कठोर बोलणे तुमचे नुकसान करू शकते. त्यामुळे विचारपूर्वक बोला, नाहीतर भांडणात अडकू शकता. कामाच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला साथ देणार नाहीत. उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या. यामुळे मंगळाचा अनिष्ट प्रभाव कमी होईल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)