ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह, 27 नक्षत्र, 12 राशी यांचं महत्त्व आहे. ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतात. तसेच ग्रहांची नक्षत्र स्थितीही खूप महत्त्वाची ठरते. कारण ग्रह राशीबदलासोबत नक्षत्र गोचरही करत असतात. ग्रहांच्या या गोचरामुळे राशीचक्रावर चांगला वाईट परिणाम दिसून येतो. 18 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या एक दिवस आधी शनिदेव पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गोचर करणार आहे. शनिच्या या स्थितीचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. शनिदेव सध्या कुंभ राशीत असून साडेसातीचा मधला टप्पा सुरु आहे. तर मीन राशीसाठी पहिला आणि मकर राशीसाठी शेवटचा टप्पा आहे. अशात हे नक्षत्र गोचर खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. तीन राशींच्या जातकांना खासकरून हे गोचर खूपच लाभदायी ठरणार आहे. या शनिच्या या स्थितीचा या राशीच्या जातकांना लाभ मिळेल. चला जाणून घेऊयात या तीन राशींबाबत
मेष : या राशीवर शनिची कृपा असणार आहे. कारण शनिदेव या राशीच्या उत्पन्न स्थानात आहेत. त्यामुळे हे नक्षत्र गोचर खूपच लाभदायी ठरणार आहे. अगदी किचकट कामंही चुटकीसरशी पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे वेगळाच आत्मविश्वास या कालावधीत वाढेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत या कालावधीत निर्माण होतील. व्यवसायात प्रगती होताना दिसून येईल. गेल्या काही महिन्यांपासून अडकलेले पैसे मिळतील.
वृषभ : या राशीच्या दहाव्या म्हणजेच कर्मस्थानात शनिदेव आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांना शनिची उत्तम साथ लाभेल. नोकरी करणाऱ्या जातकांना अपेक्षित लाभ मिळेल. मिड टर्म किंवा रखडलेलं इन्क्रिमेंट मिळू शकतं. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्यांना उत्तम संधी मिळू शकते. एकंदरीत आर्थिक स्थिती या कालावधीत मजबूत होईल. वडिलांकडूनही चांगला पाठिंबा मिळेल.
कुंभ : शनिदेव सध्या याच राशीत भ्रमण करत असून मधली साडेसाती सुरु आहे. त्यामुळे काही अंशी नक्षत्र गोचरामुळे दिलासा मिळेल. आत्मविश्वासात वाढ झालेली दिसून येईल. तसेच एखाद्या व्यक्तिवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. गुंतवणुकीसाठी ही वेळ योग्य ठरेल. पण तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अविवाहित जातकांना यावेळी लग्नासाठी स्थळं येऊ शकतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)