Astrology: 31 ऑगस्टपर्यंत या राशींसाठी असेल सुवर्ण दिवस, शुक्रच्या संक्रमणाच्या होईल आर्थिक फायदा

| Updated on: Aug 20, 2022 | 1:03 PM

वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. मीन हे त्याचे उच्च चिन्ह आहे आणि कन्या हे त्याचे दुर्बल चिन्ह आहे. शुक्रावर भरणी, पूर्वा फाल्गुनी आणि पूर्वाषाढ नक्षत्रांचे राज्य आहे. चला जाणून घेऊया शुक्राचे परिवर्तन कोणत्या राशीसाठी फायदेशीर आहे.

Astrology: 31 ऑगस्टपर्यंत या राशींसाठी असेल सुवर्ण दिवस, शुक्रच्या संक्रमणाच्या होईल आर्थिक फायदा
जोतिषशास्त्र
Image Credit source: Social Media
Follow us on

Astrology: शुक्राचे राशी परिवर्तन एका निश्चित कालावधीत होतो. याचा सर्व राशींवर परिणाम होतो. शुक्राचा राशी बदल काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी त्रासदायक. 7 ऑगस्ट रोजी शुक्रदेव मिथुन सोडून कर्क राशीत प्रवेश करत आहेत ( transit of Venus). 31 ऑगस्टपर्यंत शुक्र या राशीत प्रवेश करेल. शुक्र हा शुभ ग्रह मानला जातो. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला भौतिक, शारीरिक आणि वैवाहिक सुख प्राप्त होते. वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. मीन हे त्याचे उच्च चिन्ह आहे आणि कन्या हे त्याचे दुर्बल चिन्ह आहे. शुक्रावर भरणी, पूर्वा फाल्गुनी आणि पूर्वाषाढ नक्षत्रांचे राज्य आहे. चला जाणून घेऊया शुक्राचे परिवर्तन कोणत्या राशीसाठी फायदेशीर आहे.

  1. वृषभ- शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अडकलेले पैसे परत मिळतील. तुम्ही वाहन किंवा एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकता. नाते दृढ करण्यात आणि त्याला विशेष महत्त्व देण्यात तुमचे योगदान राहील. युवक आपले ध्येय साध्य करण्यासाठी योग्य प्रयत्न करतील. तुम्ही काही गुप्त योजनेला बळी पडू शकता. प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होतील.
  2. कन्या- कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण शुभ राहील. हा काळ तुमच्यासाठी वरदान आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. लाभदायक प्रवास घडतील. याद्वारे योग्य संधीही उपलब्ध होणार आहेत. कुटुंबाच्या सुखसोयींना हातभार लावाल. गैरसमजांमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. मनात निराशा राहील. व्यवसायात तुमच्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारा.
  3. तूळ- शुक्र संक्रमणाचा तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम होईल. या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. मालमत्ता खरेदीचा कार्यक्रम असेल तर गांभीर्याने विचार करा. कारस्थना रचण्यात आणि टीका करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. सामाजिक कार्यात महत्त्वाचे योगदान दयाल.
  4.  

    वृश्चिक- तुमची हिम्मत वाढेल. या काळात तुम्ही कठीण निर्णय घेऊ शकाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला मनःशांती मिळेल. व्यवसायात तुम्हाला काही फायदेशीर सूचना मिळतील. संवादातून तुम्ही सर्व अडथळे दूर कराल. खास लोकांशी भेट होईल. तुमच्या कामात जोडीदार तुम्हाला साथ देईल.

    (वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

  5. हे सुद्धा वाचा