Astrology: ऑगस्टमध्ये या राशींच्या लोकांसाठी असणार सुवर्णकाळ, अडकलेली कामं लागतील मार्गी

| Updated on: Jul 24, 2022 | 3:17 PM

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. बुद्धिमत्ता, पैसा, तर्क, व्यवसाय यांचा कारक असलेला बुध ग्रह 1 ऑगस्ट रोजी राशी बदलणार आहे. वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती आणि गोचर यामुळे जीवनात बदल घडत असतात. यामुळे ग्रहांच्या गोचरांना ज्योतिषशास्त्रात (Astrology) विशेष महत्त्व आहे. बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे 5 राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2022 सुवर्णकाळ असेल. एखादा ग्रह […]

Astrology: ऑगस्टमध्ये या राशींच्या लोकांसाठी असणार सुवर्णकाळ, अडकलेली कामं लागतील मार्गी
Follow us on

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. बुद्धिमत्ता, पैसा, तर्क, व्यवसाय यांचा कारक असलेला बुध ग्रह 1 ऑगस्ट रोजी राशी बदलणार आहे. वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती आणि गोचर यामुळे जीवनात बदल घडत असतात. यामुळे ग्रहांच्या गोचरांना ज्योतिषशास्त्रात (Astrology) विशेष महत्त्व आहे. बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे 5 राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2022 सुवर्णकाळ असेल. एखादा ग्रह वैयक्तिक कुंडलीत चांगल्या स्थितीत असेल आणि गोचरही शुभ स्थिती दर्शवत असेल, तर फायदा होतो. या लोकांना ऑगस्टमध्ये यश आणि पैसा मिळेल. बुध ग्रह सध्या कर्क राशीत आहे आणि 1 ऑगस्ट 2022 रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीतील बुधाचे संक्रमण 5 राशीच्या लोकांना खूप लाभ देईल.

  1. वृषभ – बुधाच्या राशी बदलामुळे वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा होईल. त्यांना नवीन नोकरीची ऑफर, बढती मिळू शकते. उत्पन्न वाढेल.
  2. सिंह – आत्मविश्वास वाढेल. मानसिक सुख आणि शांती अनुभवाल. पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. करिअरमध्ये एखाद्या मित्राची साथ मिळेल. उत्पन्न वाढेल, आर्थिक स्थिती मजबूत होईल.
  3. कन्या – कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. नोकरी किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ शकता. करिअरमध्ये बदल होऊ शकतो. स्थलांतराची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तसेच अधिकारी सहकार्य करतील.
  4. वृश्चिक – आत्मविश्वास वाढेल. आदर वाढेल. करिअरमध्ये फायदे होतील. व्यावसायिकांच्या कामाचा व्याप वाढेल आणि आर्थिक स्त्रोत वाढतील. अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम सोपे होईल. धार्मिक कार्यक्रमात भाग घेता येईल.
  5. हे सुद्धा वाचा
  6. मीन – वरिष्ठांच्या मदतीने करिअरमध्ये लाभ होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. प्रगती करता येईल. पुढे जाण्याची संधी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही नवीन कार खरेदी करू शकता.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)