बुधाची मोठ्या दिमाखात मेष राशीत एन्ट्री, राहु संपर्कात असला तरी ‘या’ राशींना अच्छे दिन

| Updated on: Apr 01, 2023 | 1:32 PM

एप्रिल महिना उजाडला असून ग्रहांची काय स्थिती आहे याकडे ज्योतिषांचं लक्ष लागून आहे. खासकरून बुध, गुरु आणि शुक्र ग्रहांचं स्थान पाहिलं जातं. कारण या ग्रहांची युती आणि स्थिती खूपच महत्त्वाची ठरते.

बुधाची मोठ्या दिमाखात मेष राशीत एन्ट्री, राहु संपर्कात असला तरी या राशींना अच्छे दिन
Budh Gochar : बुध ग्रहाचं मेष राशीत परिवर्तन, पुढचे 69 दिवस या राशींसाठी चांगले दिवस
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्राचं गणित प्रत्येक ग्रहाच्या गोचरानुसार बदलत असतं. आज चांगले दिवस असतील तर उद्या आपल्या वाटेला काय असेल याची कल्पना करणंही कठीण होतं. आता एक ग्रह चांगली फळं देत असेल. त्याच वेळी दुसरा ग्रह नकारात्मक प्रभाव टाकत असतो. त्यामुळे चांगलं वाईट वजा करून जे उरतं ते भोगावं लागतं असं साधंसोपं गणित ज्योतिषशास्त्रात मांडलं जातं. आता बुध ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. या राशीत शुक्र आणि राहु ग्रह आधीच ठाण मांडून बसले आहे. त्यामुळे बुध, शुक्र आणि राहुची युती झाली आहे.

बुध हा ग्रह धन, बुध्दी आणि व्यापार कारक ग्रह आहे. त्यामुळे कुंडलीत बुध ग्रह चांगल्या स्थितीत असेल तर जवळपास सर्वच क्षेत्रात यश प्राप्त होतं. पण जेव्हा शुभ ग्रह पाप ग्रह असलेल्या राहुच्या संपर्कात येतो तेव्हा नकारात्मक फळं देतो. बुध राहु युती 69 दिवस असणार आहे. त्यानंतर 7 जूनला बुध ग्रह वृषभ राशीत गोचर करेल. पण असं असलं तरी बुध, शुक्र आणि राहुची युती काही राशींसाठी चांगली ठरणार आहे.

त्रिग्रही युतीचा पाच राशींना होणार फायदा

मेष – या राशीत तीन ग्रह एकत्र आले आहेत. बुध, शुक्र आणि राहुची युती झाली आहे. त्यामुळे या राशीसाठी चांगले दिवस असणार आहेत. मेष राशीच्या व्यक्तींचं आकर्षण वाढेल. धनलाभासोबत मनासारखी नोकरी मिळू शकते. तसेच अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

कर्क – त्रिग्रही युतीचा फायदा या राशीचा जातकांना होईल. नवे आर्थिक स्त्रोत निर्माण होतील. अचानक पैशांची आवक सुरु झाल्याने चिंता दूर होईल. पण आरोग्यविषयक तक्रारीकडे या काळात दुर्लक्ष करू नका. असं असलं तरी ग्रहमान अनुकूल आहे.

कुंभ – या राशीवर सध्या शनिचा प्रभाव आहे. अस असलं तरी बुधाची कृपादृष्टी राहणार आहे. त्यामुळे चांगलं वाईट वजा करता बुध ग्रहाकडून चांगलं फळ मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे.

मकर – साडेसातीचा शेवटचा टप्पा असला तरी इतर ग्रहमान चांगलं आहे. त्यामुळे हा काळ सकारात्मक असेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल आणि पदोन्नती मिळू शकते. तसेच कौटुंबिक वातावरणही चांगलं राहील. योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणूक करता येईल.

सिंह – ग्रहमान तुम्हाला मानवेल अशी स्थिती आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तसेच या काळात धार्मिक कार्यात रुची वाढेल. आपल्या हातून सत्कार्य घडू शकतं. बुधाच्या कृपेमुळे वाणीवर नियंत्रण राहील त्यामुळे लोकांना आकर्षित होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा काळ चांगला राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)