मुंबई, 17 सप्टेंबर रोजी सूर्याने कन्या राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे बुधादित्य योग (Budhaditya Yog) जुळून येत आहे. बुध आधीच कन्या (Virgo) राशीत होता. हा शुभ योग 16 ऑक्टोबरपर्यंत राहील. ज्योतिषशास्त्रात (Astrology) बुधादित्य योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगात साधकाला संपत्ती, मान-सन्मान मिळतो. बुधादित्य योगामुळे 4 राशींना नशिबाची विशेष साथ मिळेल. त्यांची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.
कर्क- व्यवसायात लाभ होईल. नवीन नोकरीच्या ऑफर प्राप्त होतील. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या शुभ मुहूर्ताचा फायदा घ्या. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील.दूरच्या प्रवासाचा योग संभवतो. त्याचाही फायदा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. पती-पत्नीमध्ये सामंजस्य चांगले राहील.
सिंह- प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. नोकरीत प्रमोशन अडकले असेल तर या योगात ते मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. सहकाऱ्यांशी संबंध मधुर होतील. दिलेले पैसे परत केले जातील. व्यापारी वर्गाला चांगला नफा मिळेल. आरोग्य सामान्य राहील. सुख-सुविधा वाढतील. वैवाहिक जीवन मधुर होईल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)