Astrology: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
- मेष- आज तुमचा कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. नोकरीमध्ये तणाव कमी असणार आहे.
- वृषभ- आजच्या दिवशी कुटुंबात एकजुटता येईल. तसंच आरोग्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावं.
- मिथुन- आजच्या दिवशी तुमचं संपूर्ण दिवस मन प्रसन्न राहील. आज केलेल्या नवीन योजना यशस्वी ठरतील. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळेल.
- कर्क- आजच्या दिवषी संपूर्ण वेळ धावपळ राहील. व्यापारात काहीही बदल करु नका. पायदुखीच्या समस्येमुळे त्रस्त राहण्याची शक्यता आहे.
- सिंह- आजच्या दिवशी सरकारी नोकरीसाठी अर्ज करा. व्यापारात संध्याकाळी यश मिळण्याची शक्यता आहे.
- कन्या- या राशीच्या व्यक्तींच्या विवाहच्या समस्या दूर होतील. आजच्या दिवशी तुमच्या जवळच्या मित्राचा सल्ला घ्या. एखाद्या मुलीच्या विवाहात मदत करा.
- तुळ- आजच्या दिवशी तुमची बिघडलेली सर्व काम पूर्ण होतील. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली राहणार आहे. घरातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे.
- वृश्चिक- आजच्या दिवशी वैवाहिक जीवन ताणतणाव असणार आहे. दुपारनंतर कोणतंही शुभ कार्य करू नका, संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल.
- धनु- विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष द्यावं लागणार आहे. कुटुंबासोबत तुम्ही एकत्र कुठे फिरायला जाऊ शकता. संपूर्ण दिवस आरामात जाईल.
- मकर- आजच्या दिवशी मनात चुकीचे विचार येऊ देऊ नका. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा न करता औषधं वेळेवर घ्या. मनातील चिंता दूर होतील.
- कुंभ- नवीन नोकरीची संधी मिळेल. मान सन्मान प्राप्तीचे योग आहेत. तुमच्या वडिलांचा सल्ला घ्या.
- मीन- आजच्या दिवशी आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवा. करियरमध्ये सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)