अनेक जण संकटाला (times of crisis) घाबरून पुढे पावले टाकताच नाहीत तर काही लोक याच्या अगदी विरुद्ध असतात. ते खंबीरपणे उभे राहून संकटाचा सामना करत असतात. यात त्याच्या आत्मविश्वास तर महत्वाचा असतोच, मात्र अजून एक गोष्ट परिणाम करत असते. ती म्हणजे त्यांची रास. राशीनुसार (Astrology)देखील हे कोणत्या परिस्थितीत कसे वागतील हे ठरत असते. काही राशीचे लोक संकट काळातही सर्वांना पुरून उरतात तर काही त्या संकटांना सामोरे जाण्यास सक्षम ठरत नाहीत. संकटे ही सांगून येत नसतात आणि त्यांना खंबीरपणे सगळेच सामोरे नाही जाऊ शकत. 12 राशीतील या राशींचे लोक संकट काळातही सर्वांना पुरून उरतात. पाहू या त्या राशी
- वृषभ: वृषभ राशीचे लोक खूप हुशार असतात आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. ते त्यांच्या आयुष्यात सर्व साध्य करतात, जे बऱ्याच लोकांसाठी एक स्वप्नच असते. ते त्यांच्या वयाच्या दुसऱ्या टप्प्यात विलासी जीवन जगतात. त्यांच्याकडे भरपूर पैसा तर असतोच, पण त्यासोबतच त्यांना खूप प्रसिद्धीही मिळते.
- कर्क: कर्क राशीचे लोक मेहनती असतात आणि यश मिळवण्यासाठी लहानपणापासूनच प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांना सहज यश मिळते. पैशाच्या बाबतीत त्यांचे नशीब बलवान असते आणि ते अनेक प्रकारे पैसे कमावतात. या लोकांना कुटुंबाकडून वारसाहक्काने भरपूर संपत्ती आणि संपत्तीही मिळते.
- सिंह: सिंह राशीचे लोक बलवान, धैर्यवान, उत्साही आणि चांगले नेते असतात. त्यांच्याकडे यशस्वी होण्यासाठी सर्व गुण असतात, ज्यामुळे त्यांची खूप प्रगती होते आणि सन्मान देखील मिळतो. हे लोक यशस्वी होतात.
- वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांच्या मनात लहानपणापासून भौतिक सुखसोयी मिळवण्याची तळमळ असते आणि ती मिळवण्यासाठी ते लहानपणापासूनच मेहनत करत असतात. ते नेहमी लक्झरी लाइफचे स्वप्न बघतात आणि ते पूर्णाकण्यासाठी सतत मेहनत करत असतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)