Astrology : ऑक्टोबरमध्ये चार ग्रहांचे राशी परिवर्तन, या राशीच्या लोकांच्या समस्या वाढणार

| Updated on: Sep 29, 2023 | 9:04 AM

19 ऑक्टोबर रोजी बुध आपले स्थान बदलून तूळ राशीत प्रवेश करेल. 30 ऑक्टोबरला राहू आणि केतूचे संक्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) 4 राशींसाठी या ग्रहांचे संक्रमण चांगले राहणार नाही. या राशीच्या लोकांना या महिन्यात अशुभ ग्रहांच्या प्रभावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे खर्चात वाढ होईल. महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात.

Astrology : ऑक्टोबरमध्ये चार ग्रहांचे राशी परिवर्तन, या राशीच्या लोकांच्या समस्या वाढणार
जोतिषशास्त्र
Follow us on

मुंबई : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात बुध आणि शुक्राच्या संक्रमणाने होईल. 1 ऑक्टोबरला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. त्याच दिवशी शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. 3 ऑक्टोबरपासून मंगळ तूळ राशीत येईल. यानंतर 18 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल. 19 ऑक्टोबर रोजी बुध आपले स्थान बदलून तूळ राशीत प्रवेश करेल. 30 ऑक्टोबरला राहू आणि केतूचे संक्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) 4 राशींसाठी या ग्रहांचे संक्रमण चांगले राहणार नाही. त्यांना पैसा, कुटुंब आणि आरोग्य याबाबत काळजी घ्यावी लागेल.

या राशीच्या लोकांवर होईल प्रभाव

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना ऑक्टोबर महिन्यात खूप त्रास होऊ शकतो. ग्रहांच्या प्रभावामुळे कामात यश सहजासहजी मिळणार नाही. महिन्याच्या मध्यापर्यंत स्थिती सुधारेल. तुम्ही या महिन्यात तुमच्या बजेटपेक्षा जास्त खर्च करू शकता. आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायाच्या बाबतीत सजग राहाण्याची गरज आहे. या काळात काही लोभ दाखवणारे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. अशा भसव्या प्रस्तावापासून सावध राहा.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना या महिन्यात अशुभ ग्रहांच्या प्रभावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे खर्चात वाढ होईल. महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. ऑफिसमधील सहकाऱ्यांपासून सावध राहा. ते तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. या काळात नाते संबंधात तणाव जाणवेल. आई वडिलांचे म्हणणे ऐकून घ्यावे. मुलांच्या शिक्षणासंबंधी चिंता जाणवेल. खर्चाचा मेळ बसवणे कठीण जाईल.

हे सुद्धा वाचा

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना आव्हानात्मक असू शकतो. कोणालाही कर्ज देऊ नका. तुम्ही बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात पुढे ढकला. सूर्य ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला आर्थिक बाबतीत अडचणींना सामोरे जावे लागेल. या महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात विलंब लागू शकतो. या काळात मोठी गुंतवणूक करणे टाळा.

वृश्चिक

राहूच्या अशुभ प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या महिन्यात तब्येत बिघडू शकते. आर्थिक बाबतीत तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागू शकते. ऑफिसमध्ये कोणाशी विनाकारण वाद होऊ शकतो. बॉससोबतच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)