मुंबई : अनेक लोकांसाठी, सोने परिधान करणे फायदेशीर नसते. जोतिशषास्त्रानुसार (Astrology) असे मानले जाते की, काहीवेळा लोकांना सोने परिधान केल्यामुळे नुकसान सहन करावे लागते, तर काहीवेळा सोने धारण केल्याने तुमच्या जीवनात अशुभ घटना घडतात. परंतु काहीवेळा अनेक लोकांसाठी सोने परिधान करणे शुभ ठरू शकते. चला जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना एकतर सोने धारण केल्यामुळे काही नुकसान सहन करावे लागते किंवा त्यांच्यासोबत अशी काही घटना घडते ज्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.
वृषभ राशीच्या लोकांसाठी सोने धारण करणे किंवा बाळगणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की जेव्हा लोक या राशीसाठी सोने घालतात तेव्हा त्यांना काही प्रकारचे नुकसान सहन करावे लागते.
मिथुन राशीच्या लोकांसाठी सोने चांगले नाही, सोने धारण केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. ज्या लोकांच्या पत्रिकेत बृहस्पति ग्रहाची स्थिती अशुभ असते त्यांना सोने खरेदी किंवा परिधान करून फायदा होत नाही.
कन्या राशीच्या लोकांनी चुकूनही सोने घालू नये. अनेक वेळा कन्या राशीच्या लोकांना सोने परिधान केल्यामुळे आयुष्यात अशा घटनांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचते.
कुंभ राशीच्या लोकांना सोने धारण केल्याने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. अनेक वेळा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो. त्यामुळे ते नाराजही होऊ शकतात. हे लक्षात ठेवा आणि सोन्याच्या वस्तू घालू नका.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)