Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांना उधार दिलेले पैसे परत मिळतील

| Updated on: Jan 11, 2023 | 7:56 AM

आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना उधार दिलेले पैसे परत मिळतील
राशी भविष्य
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. अनावश्यक खाचा टाळा. भूतकाळात रममाण व्हाल
  2. वृषभ- लांबच्या प्रवासाचा योग असणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. जबाबदारीचे काम हाताळायला मिळेल.
  3. मिथुन- आजच्या दिवशी तुम्ही नात्यांमध्ये सावध राहिलं पाहिजे. व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्याचा फायदा होणार आहे. कोणाशीही भांडण करू नका.
  4. कर्क- जेष्ठांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या. जुनी इच्छा पूर्ण होणार आहे. नातेसंबंध सुधारू शकतात.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- घरामध्ये आज सकारात्मकता नांदणार आहे. घरातील मोठ्याच्या आशिर्वादानं पुढे जाण्याची तुम्हाला चांगली संधी आहे.
  7. कन्या- आज तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होणार आहे. जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे मात्र तरीही काळजी घ्यावी. बचतीला प्राधान्य द्यावे.
  8. तूळ-  अचानक दुखापत होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा आदर करा. अडकलेले काम मार्गी लागेल.
  9. वृश्चिक- आज तुम्हाला सकाळी सकाळी चांगली बातमी कळणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी सांभाळा. मित्रांची साथ लाभणार आहे.
  10. धनु- कामाच्या ठिकाणी तुम्ही स्तुतीस पात्र ठरेल. भाग्य तुमच्या सोबत असणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल.
  11. मकर- आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या घरातल्या व्यक्तींची मनं ओळखायला शिका. नोकरीच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो.
  12. कुंभ- आजच्या दिवशी नोकरीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेऊ नका. उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत.
  13. मीन- या राशीच्या व्यक्तींना जवळच्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळू शकते. गुंतवणूक करता विचारपूर्वक करा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)