Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांची आर्थिक चिंता दूर होईल

| Updated on: Dec 14, 2022 | 7:48 AM

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या मार्गी लागणार.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांची आर्थिक चिंता दूर होईल
आजचे राशी भविष्य
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

 

  1. मेष- दिवस आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
  2. वृषभ-  दिवस चिंतामुक्त जाईल. जोडीदाराचे प्रेम मिळेल.  आज आर्थिक प्रकरणं मार्गी लागतील. धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल.
  3. हे सुद्धा वाचा
  4. मिथुन-  अनावश्यक साहस करू नका. कोणत्याही वादात पडू नका. व्यापारामध्ये लाभ होणार आहे. व्यवसायाच्याच निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे.
  5. कर्क- नोकरी संदर्भात नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता. पित्ताचा त्रास जाणवेल. लग्नाचे योग आहेत. सद्यस्थिती पाहता भविष्यातील बेत आखत त्या मार्गानं काम करण्यासाठी योग्य वेळ आहे.
  6. सिंह- रागामुळे प्रियजन दुखावतील.  रात्री उशिरापर्यंत जागू नका. आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्याआधी विचार करा.
  7. कन्या- तुमच्यातील चांगल्या वाईट गोष्टी कोणाला सांगू नका.  नातेसंबंधांचा आदर करा. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा.
  8.  तुळ- नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण जरा जास्त असेल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा. आरोग्याची काळजी घ्या.
  9. वृश्चिक- धनलाभ होणार आहे. रखडलेले व्यवसाय चालू होतील. नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदाचा आहे.  ज्येष्ठांचा आशीर्वीद मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळेल.
  10. धनु- विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. आरोग्याची चिंता दूर होईल. आर्थिक चिंता दूर होईल. कोणताही निर्णय घेण्याआधी वरिष्ठांचा सल्ला घ्या.
  11. मकर- ऑफिस कामात व्यस्त असाल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. उधार दिलेले पैले पुन्हा मिळतील. प्रवास लाभदायक ठरेल. धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा.  कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.
  12. कुंभ- आरोग्याची काळजी घ्या. डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे. गरीब व्यक्तींना मदत करा. तुमची कामे वेळेवर पूर्ण करा. धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा.  कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.
  13. मीन- जवळच्या मित्रांना तुमच्या मनातील गोष्टी सांगा यामुळे समस्या सुटेल. येणाऱ्या काही दिवसांत आजची मेहन खूप उपयुक्त ठरेल. पैसे मिळवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)