Astrology: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
- मेष- वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे मतभेद मिटतील. फिरण्याचा योग आहे. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे.
- वृषभ- आज कोणताही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तो पुढे ढकला. तसंच कोणत्याही वादात पडू नका. संध्याकाळपर्यंत शुभ बातमी मिळेल.
- मिथुन- महत्त्वाची कामं दुपारच्या आत आटपून घ्या. कुटुंबाचं सहकार्य लाभणार आहे. अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा मिळणार आहे.
- कर्क- नव्या कार्याला सुरुवात होणार आहे. सर्व कामं वेळेवर पूर्ण करा. इतरांची मदत करा.
- सिंह- तुमच्यापेक्षा मोठ्यांचा आदर करा. जोडीदारासोबतचा दुरावा अखेर संपणार आहे. अपघात होण्याची शक्यता त्यामुळे काळजी घ्या.
- कन्या- विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं. नवी संधी तुमच्या हातून जाऊ शकतात. व्यवसायात फायदा होणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
- तूळ- जोडीदाराकडून मान सम्नान मिळेल. आपल्या व्यक्तीची साथ कधीच सोडू नका. जुन्या मित्राची भेट होईल.
- वृश्चिक- मोठी गुंतवणूक टाळा. आरोग्याशी संबंधित कुरबुरी असतील. लांबच्या प्रवासाचा योग आहे. खाण्यावर नियंत्रण ठेवा. अडकेलेले पैसे मिळतील.
- धनु- आजच्या दिवशी नोकरीत बढतीचा योग आहे. दुपारनंतर चांगली बातमी मिळणार आहे. कोणालाही पैसे उधार देऊ नका.
- मकर- या राशीच्या व्यक्तींना मानसिक चिंता वाढेल. तसंच आज कोणाशीही वाद घालू नका. दुर्गा देवीची पूजा करा.
- कुंभ- नोकरीत प्रगती होण्याचा योग आहे. कुटुंबात वाद विवाद टाळा. सकाळी योगासनं करा.
- मीन- व्यवसायाशी निगडीत लोकांना फायदा होईल. विद्यार्थ्यांना नव्या संधी मिळणार आहेत. नोकरीत बदल होईल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)