आजचे राशी भविष्य
Image Credit source: TV9 Marathi
मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
बारा राशींचे राशी भविष्य
- मेष: मन प्रसन्न राहील. कुटुंबात सुख शांती राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यात सुधारणा होईल. व्यवसायात अधिक मेहनत करावी लागेल. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल.
- वृषभ: आत्मविश्वासात कमी जाणवेल. एखाद्या गोष्टीवरुन चिंता सतावेल. नोकरीची नवी संधी चालून येईल. व्यवसाय वाढीसाठी मित्राचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.
- मिथुन: परिवारात धार्मिक कार्य होऊ शकतात. नोकरीत वरिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल, मात्र, कामाचा दबाव वाढेल. नोकरीची नवी संधी चालून येईल.
- कर्क: उत्पन्नात वाढ होईल. अचानक धनलाभाचा योग आहे. स्वभावात चिडचिडपणा असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. लवकरच आनंदाची बातमी मिळेल.
- सिंह: आत्मविश्वासात वाढ होईल. घरात लवकरच धार्मिक कार्य होतील. मित्रांच्या सहयोगाने रखडलेले काम मार्गी लागेल. उत्पन्नात वाढ होईल.
- कन्या: व्यवसायात वाढ होईल. वडिलांचा चांगला आशीर्वाद मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीच्या ठिकाणी नवी संधी उपलब्ध होईल. अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल.
- तूळ: व्यवसायात वाढ होईल. धावपळीचा दिवस असेल. मनात वेगवेगळ्या विषयांवरुन चिंता असेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरी निमित्त लवकरच इतरत्र प्रवास करण्याचा योग निर्माण होईल.
- वृश्चिक: मन प्रसन्न राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. परदेशात जाण्याचा योग निर्माण होईल. आत्मविश्वासात वाढ जाणवेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
- धनु: नोकरीत अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक जीवन सुखमय असेल. आरोग्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. अनियोजित खर्चात वाढ होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करा.
- मकर: आत्मविश्वासात वाढ होईल. वाद-विवाद टाळा. व्यवसायात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. कुटुंबात जबाबदारी वाढू शकते. वडिलांचे चांगले सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
- कुंभ: मनात असंतोष असेल. नोकरीत परिवर्तन होऊ शकते. कामानिमित्त परिवारापासून दूर रहावे लागू शकते. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना नोकरीची नवी संधी उपलब्ध होईल.
- मीन: लवकरच आनंदाची बातमी मिळेल. रखडलेले काम मार्गी लागेल. उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढल्याने संपत्ती खरेदी करण्याचा विचार कराल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)