Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी नोकरीत बदल करणे टाळावे

| Updated on: Nov 09, 2022 | 7:37 AM

या राशीच्या लोकांनी नोकरी आणि व्यवसायात बदल करणे टाळावे तुमचा आजचा दिवस कसा जाणार जाणून घेऊया.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी नोकरीत बदल करणे टाळावे
आजचे राशी भविष्य
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

 

  1. मेष- कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. आजच्या दिवशी कुटुंबातील वाद मिटतील. प्रवास शक्यतो करू नका.
  2. वृषभ- आजच्या दिवशी नव्या व्यापारात गुंतवणूक करू नका. तसंच गाडी चालवताना काळजी घ्या. समाजात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. मिथुन- नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार शक्यतो टाळा. तसंच आजच्या दिवशी पैसे कोणालाही उधार देऊ नका. मिक्स मिठाई दान करा.
  5. कर्क- आजच्या दिवशी लांबच्या प्रवासाचा योग आहेत. तसंच आज जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. धावपळ करावी लागेल.
  6. सिंह- आजच्या सायंकाळी घरी लवकर पोहोचा. उधार उसणवारी दिलेले पैसे परत मिळतील. अपत्य प्राप्तीचे योग आहेत.
  7. कन्या- या राशीच्या व्यक्तींना तगड्या पगाराची नोकरी मिळेल. अनपेक्षीत धनलाभ होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल.
  8. तूळ- आजच्या दिवशी प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. मुलांकडून आनंदवार्ता मिळणार आहे. मित्राची समज काढावी लागेल.
  9. वृश्चिक- आजच्या दिवशी लांबच्या प्रवासाचे योग आहे. तसंच या राशीच्या व्यक्तींना प्रेमात यश मिळणार आहे. रागावर नियंत्रण मिळवावं लागेल.
  10. धनु- मनात एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती येईल. अपत्य प्राप्तीचे योग आहेत. दररोजच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता.
  11. मकर- महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या. घरात आज कोणत्याही कामामध्ये वडिलांचा सल्ला घ्या. नाते संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
  12. कुंभ- या राशीच्या व्यक्तींचा मानसिक तणाव वाढेल. थोरामोठ्याचा सल्ला जरूर घ्या. नातेसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या
  13. मीन- आजच्या दिवशी तुमची जुनी इच्छा पूर्ण होईल. तुमच्याबद्दलची रहस्य कोणालाही सांगू नका. व्यापारात परिवर्तनाचे योग आहेत.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)