Todays Horoscope: आजचे राशी भविष्य 2 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांची नोकरीत प्रगती होईल

| Updated on: Feb 02, 2023 | 1:00 AM

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस.

Todays Horoscope: आजचे राशी भविष्य 2 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांची नोकरीत प्रगती होईल
राशी भविष्य
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

 

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

 

हे सुद्धा वाचा

मेषः

नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. कामासाठी दुरचे प्रवास घडतील. प्रवासातून लाभ होईल. आकस्मिक धनलाभ होईल.

वृषभः

मागील केलेल्या कामात यश मिळेल. मनात प्रसन्नता राहील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. नोकरीत प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होईल. आपण हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्ती होईल. व्यापारीवर्गातील उत्त्पन्नात वाढ होईल. मोठे प्रकल्प मार्गी लागतील. नवीन व्यवसायाची सुरवात करा. चांगल्या कल्पक योजना मांडा. आज यश प्राप्त होईल. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य मिळेल.

मिथुनः

काही नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. मनावर संयम ठेवून वाटचाल करावी. अपूर्ण राहिलेली कामे वेळेत करावी.कामाचा ताणतणाव राहील. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान संभवते. फसवणूकी सारखे प्रकार घडतील. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीन करावे. विचलित व्हाल. मनस्तापासारखा घटना घडली.कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असमाधान आणि असंतोष निर्माण होईल. मोठे व्यवहार टाळावेत. प्रकृतीची काळजी घ्या.

कर्कः

नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. आर्थिक दृष्या खुपच चांगला काळ आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. नवीन वस्तुबाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल व निर्णय घेतला जाईल. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल.

सिंहः

आर्थिक आवक वाढेल. बऱ्याच प्रकारचे लाभ होतील. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल. मित्रमैत्रिणीत स्नेह वाढेल. इतरावर आपला प्रभाव राहील. मान, सम्मान, प्रतिष्ठा वाढवेल. कलाकारांना योग्य संधी प्राप्त होतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तीनांही लाभदायक दिनमान असेल. संतती आणी भांवडाकडून सौख्य लाभेल. नोकरी, व्यापारात प्रगतीचे योग आहेत. कार्यात मग्न राहा. मित्राच्या सहकार्याने नवीन कामात यश मिळण्याचे योग आहेत.

कन्याः

परदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार नोकरी बदलाचा विचार करीत असाल तर उत्तम योग आहे. भाग्य अनुकुल आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. त्याचबरोबर लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. महिलावर्गास शासनाकडून मान-सन्मान मिळेल. त्याचबरोबर आर्थिक लाभही होणार आहे. मन प्रसन्न आणि आनंदी असेल. व्यवसायिकांना आर्थिक लाभ होईल. जास्त फायदा मिळण्याच्या टृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील.

तुलाः

नोकरीच्या बाबतीत जपून निर्णय घ्या. अचानक संकट येण्याची संभावना आहे. मित्र, नातेवाईकांशी व्यवहार जपुन करावेत. तुम्हाला वादामधुन नुकसान सहन करावे लागेल. वाद टाळणे हितावह होईल. व्यवसायात विरोधक उघड शत्रुत्व पत्करतील. आरोग्याच्या दृष्टीने अशुभ दिनमान आहे. आजारपण व्याधी उद्‌भवतील. ऑपरेशन तसेच वाहन जपून चालवावे अपघाताचा योग संभवतो. डोळे, तळपाय, पचनसंध्येशी संबंधित विकार याकडे दुर्लक्ष करू नये. आहारावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिकः

पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. प्रवासातून लाभ होतील. परदेशभ्रमणासाठी उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहिल. व्यापारात आर्थिक लाभ होणार आहे. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपुन घ्यावा. नवीन योजनेत वाढ विस्तार करण्यासाठी अनुकुल दिवस आहे. सामजिक आणी सांस्कृतिक कार्यात आपला सहभाग राहिल.

धनुः

प्रकृतीवर विपरित परिणाम होतील. आळश झटकुन कामाला लागा.शारिरिक व्याधी जुने आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर संततीविषयी मन चिंताग्रस्त राहील. नोकरीत मनाजोग्या घटना घडणार नाही. विपरित परिणाम दिसतील.व्यवसायात भागीदारासोबत वाद होण्याची शक्यताआहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढेल. मोठी शस्त्रक्रिया अपधात भय संभवते. कुटुंबात, समाजात आपल्या कामाची अवहेलना होईल. गुप्तशत्रुपासुन त्रास जाणवेल.

मकरः

कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीना प्रगती कारक आहे. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. नोकरी व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. शासकीय लाभ होतील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. घाईगडीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे.विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती उत्तम राहील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. जुनी येणी वसूल होईल.प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील.

कुंभः

नोकरीत वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. मनात उर्जा आणि सकारात्मना वाढेल वाहन घर खरेदी साठी शुभ दिवस आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल.कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल, विरोधकावर मात कराल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. नवीन घर, वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. शारिरिक कामात वाढ करण्याचा प्रयत्न करा.

मीनः

अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. मित्रमैत्रिण, नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. महत्वाची कामे तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या वेळेस पुर्ण होतील. अचानक धनलाभाची संधी मिळेल. शेअर मार्केट मध्ये फायदा होईल. यश निश्चित लाभेल.सातत्य ठेवा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)