लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो. संसार सुखाचा व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असते, मात्र बऱ्याचदा पती-पत्नीमध्ये मतभेद किंवा इतर कारणांमुळे खटके उडतात. छोट्या-मोठ्या तक्रारी या प्रत्येकाच संसारात असतात पण भांडणं जेव्हा विकोपाला जातात तेव्हा तो चिंतेचा विषय बनतो. जोतिषशास्त्रानुसार (Astrology) वैवाहिक जीवनातील कलहामागे पत्रिकेतील दोष असू शकतात. यापैकी एक म्हणजे गुरू चांडाळ दोष आहे. जोतिषशास्त्रानुसार सातवे घर हे विवाहाचे आणि जोडीदाराचे आहे. तसेच चौथे घर हे सुखाशी संबंधित आहे. या घरात जेव्हा राहू आणि आणि गुरु एकत्र येतात तेव्हा गुरू चांडाळ योग (Guru Chandal Yoga) तयार होतो.
ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योगांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्यापैकीच एक म्हणजे गुरू चांडाळ योग आहे. कुंडलीतील कोणत्याही घरात राहूसोबत गुरू ग्रह स्थित असेल तर हा योग तयार होतो. ज्या घरामध्ये हा योग असतो त्या घराचे शुभ परिणाम कमी होतात. त्याच वेळी कुंडलीच्या वेगवेगळ्या घरांमध्ये त्याचा परिणाम थोडासा बदलतो. गुरू आणि राहु कोणत्या राशीत आहेत, त्याचबरोबर गुरू बलवान असेल तर हा या योगाची तीव्रता कमी होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु चांडाळ योग तयार होतो, तेव्हा ती व्यक्ती यशासाठी संघर्ष करत असते. पैशाची कमतरता पदोपदी जाणवते. जीवनात नकारात्मकता येते. पत्रिकेत सातवे घर हे विवाहाशी संबंधित आहे. या घरात राहू आणि गुरू एकत्र आल्यास वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)