मुंबई, भोलेनाथाच्या पूजेला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण ज्योतिषशास्त्रातही (Astrology) ती खूप फलदायी मानली गेली आहे. यंदा महाशिवरात्री (Mahashivratri 2023) हा सण 18 फेब्रुवारीला साजरा होणार आहे. या दिवशी वर्षांनंतर एक दुर्मिळ योग देखील तयार होत आहे, ज्यामध्ये शिवाची पूजा केल्याने शनिदेवाची विशेष आशीर्वादही प्राप्त होणार आहे. पौराणिक कथेनुसार भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. भोलेनाथांनी शनिदेवाला सांगितले होते की तू माझ्या भक्तांवर वक्रदृष्टी ठेवणार नाहीस. त्यामुळे शिवभक्त शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्त राहतात.
यंदा महाशिवरात्रीचा उत्सव शनिवारी आहे. शनि त्रयोदशी तिथी म्हणजेच शनि प्रदोष व्रत देखील याच दिवशी पाळले जाते. प्रदोष व्रत आणि शिवरात्री दोन्ही शिवाला अतिशय प्रिय आहेत. अशा स्थितीत या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने दोन्ही व्रताचे फळ मिळेल. या दिवशी शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान आहेत. अशा स्थितीत शनि प्रदोषाचे व्रत केल्यास त्यांचे अशुभ परिणाम कमी होऊन शुभ परिणाम वाढतात. असं असलं तरी शनिदेवाच्या दर्शनाचा शिवभक्तांवर काहीही परिणाम होत नाही, असं मानलं जातं. अशा स्थितीत महाशिवरात्रीला केलेली पूजा शिव आणि शनी या दोघांशी संबंधित फल देईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)