मुंबई : इंग्रजी कॅलेंडरचा दुसरा महिना फेब्रुवारी संपला आहे आणि तिसरा महिना मार्च सुरू झालेला आहे. मार्च महिना त्यांच्यासाठी आनंद घेऊन येईल, अशी आशा सर्वांनाच आहे. पण ग्रह-ताऱ्यांची हालचाल काही वेगळेच दर्शवत आहे. ज्योतिषीय (Astrology) गणनेनुसार, मार्च महिना आर्थिक बाबतीत चार राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवू शकतो. काही राशीच्या लोकांना अनावश्यक खर्चाला समोर जावे लागू शकते. यामुळे खर्चाचे बजेट बिघडू शकते. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.
नोकरीत काही समस्या निर्माण होऊ शकतात. व्यवसायिकांसाठी महिन्याची सुरुवात अनुकूल राहील. परंतु महिन्याच्या शेवटी तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. अधिक नफा मिळविण्याच्या प्रयत्नात नुकसान होऊ शकते. व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
तुमच्या आर्थिक परिस्थितीवर दबाव येऊ शकतो. खर्च वाढतील आणि उत्पन्नाच्या स्रोतांवर परिणाम होईल. आर्थिक आघाडीवर विचारपूर्वक निर्णय घ्या. गुंतवणुकीत घाई करू नका. या महिन्यात कर्जाचे व्यवहार अजिबात करू नका. कर्ज घेतलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असेल.
या महिन्यात कर्क राशीच्या लोकांचे अनपेक्षित खर्च वाढतील, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. मोठे आर्थिक निर्णय घेण्यासाठी ही चांगली वेळ नाही. कोणत्याही प्रकारची व्यावसायिक गुंतवणूक टाळा. घर, दुकान, वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी वेळ अनुकूल नाही. तथापि, या महिन्यात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो.
तुमचा खर्च खूप जास्त असू शकतो. या महिन्यात तुम्ही दोन्ही हातांनी पैसे खर्च कराल. यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. पैशांची बचत करतानाही काही समस्या उद्भवू शकतात. या महिन्यात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. पैशाचा सदुपयोग करण्यावर भर द्यावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)