मार्च महिन्यात या चार ग्रहांचे होणार राशी परिवर्तन, या राशींसाठी ठरू शकतो भाग्योदयाचा काळ

| Updated on: Feb 22, 2023 | 8:46 PM

मार्च महिन्यात मंगळ मिथुन राशीत तर शुक्र मेष राशीत प्रवेश करेल. तर सूर्यदेव मीन राशीत प्रवेश करतील. यासोबतच बुधही मीन राशीत अससल्याने बुधादित्य योग निर्माण होईल.

मार्च महिन्यात या चार ग्रहांचे होणार राशी परिवर्तन, या राशींसाठी ठरू शकतो भाग्योदयाचा काळ
राशी भविष्य
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : मार्च महिना हा कर्मचारी वर्गासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) ग्रहांचे बदल आपल्या जीवनावर परिणाम करतात. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात चार ग्रहांची स्थिती बदलत आहे. त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल. मार्च महिन्यात मंगळ मिथुन राशीत तर शुक्र मेष राशीत प्रवेश करेल. तर सूर्यदेव मीन राशीत प्रवेश करतील. यासोबतच बुधही मीन राशीत अससल्याने बुधादित्य योग निर्माण होईल. यानंतर बुध मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. या बदलाचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी मार्च महिना शुभ राहील.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना मार्चमध्ये या योगाचा फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. करिअरशी संबंधित अनेक संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. कामामुळे नवी ओळख निर्माण होईल.  गाईला हिरवा चारा आणि पालक खायला द्या. रखडलेले कामं मार्गी लागतील

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी मार्च महिना महत्त्वाचा आहे. नोकरदार लोकांची प्रगती होईल. व्यापाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. परदेशात काम करणार्‍या स्थानिकांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. एकूणच, हा महिना नवीन संधी आणि प्रगती देईल.

हे सुद्धा वाचा

तूळ

तूळ राशीच्या लोकांना या महिन्यात देवी लक्ष्मीची कृपा असेल. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. उच्च शिक्षणाची संधी मिळेल. ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा प्रभाव तुमच्या जीवनावरही दिसून येईल. हा महिना व्यवसायात नवीन संधी घेऊन येईल.

मीन

मीन राशीसाठी मार्च महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करू नका. गोड बोलणे तुमच्या कामी येईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)