जोतिष्यशास्त्रात (Astrology) रुची असणाऱ्यांना ग्रहांच्या गोचराबाबत उत्सुकता असते. ग्रहांचे गोचर (planet transit in july) आणि राशींवर होणार परिणाम जाणून घेणे हा त्यामागचा उद्देश असतो. ग्रह कोणत्या स्थानात आहे आणि कोणते फळ देईल यावरून ज्योतिष मानणारे योजना आखतात. ग्रहांच्या गोचरामुळे 12 राशींवर प्रभाव पडतो. काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ फळं मिळतात. जुलै महिन्यात ग्रह गोचर करण्यासोबत वक्रीही होणार आहेत. गुरु ग्रह 29 जुलैला आपल्या स्वराशीत वक्री होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेवेहा तो वेगाने फळ देतो. गुरु ग्रह ज्ञान, प्रगती, शिक्षक, संतान, दान आणि पुण्याशी संबंधित ग्रह आहे. गुरु ग्रह वक्री होणार असल्याने तीन राशींना चांगले परिणाम मिळतील.
- वृषभ – ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीच्या अकराव्या स्थानात गुरु ग्रह वक्री होणार आहे. या स्थानाला उत्पन्नाचे स्थान मानले जाते. बृहस्पति ग्रह वक्री होणार असल्याने या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. व्यापार्यांनाही विशेष परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या दरम्यान, एक मोठा करार निश्चित केला जाऊ शकतो. आपल्या कुंडलीनुसार गुरू आठव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे संशोधन क्षेत्राशी संबंधित लोकांचा काळ चांगला जाणार आहे.
- मिथुन – या राशीच्या दहाव्या घरात गुरु वक्री होत आहे. हे स्थान नोकरी, व्यवसाय निगडीत आहे. गुरुच्या वक्री काळात नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायातही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला राहील. मार्केटिंग, मीडिया, फिल्म लाइन, बँकिंग इत्यादी क्षेत्राशी निगडित लोकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध आणि गुरू यांच्यातील मैत्री तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे.
- कर्क – या राशीच्या नवव्या स्थानात गुरु वक्री होणार आहे. या स्थानाला भाग्य आणि परदेश प्रवासाचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या दरम्यान प्रलंबित कामे पूर्ण केली जातील. व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास लाभदायक ठरेल. परदेशात व्यवसाय करणारे लोक देखील चांगले पैसे कमवू शकतात. त्याचबरोबर खाद्यपदार्थ, हॉटेल्स, रेस्टॉरंटशी संबंधित लोकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरेल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)