लक्ष्मी माता
Image Credit source: Social Media
जोतिषशास्त्रात (Astrology) धनार्जनाचे आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय सांगितले आहे तसेच ग्रहांच्या अनुकूलतेमुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा होते. बऱ्याचदा काही लोकांना सतत पैशांची चणचण भासते. तर काही लोक कठीण परिस्थितही संयम बाळगतात आणि त्यातून त्यांना चांगले दिवस येतात. हे पैसेही ते त्यांच्या मेहनतीतून आणि क्षमतेने कमावतात आणि नशीबही त्यांच्यावर मेहरबान असते. या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी खूप प्रसन्न असते. येणाऱ्या काळात माता लक्ष्मी पाच राशींवर आपली कृपा बारसवणार आहे.
- वृषभ- या राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे तुम्ही लग्झरी आयुष्य जगता. तुमच्या आयुष्यात रोमान्स आणि पैसा दोन्ही गोष्टी भरपूर आहेत. पैसे कमवण्यासाठी हे लोक खूप मेहनत करतात. येणाऱ्या काळात तुम्हाला अचानक धनलाभ संभवतो. जुन्या स्थावर मालमत्तेचे प्रश निकाली लागतील. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होण्याची शक्यता आहे.
- कर्क- या राशीचा स्वामी चंद्र आहे. हे लोक खूप मेहनती असतात. आपल्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांच्याकडे पैसेही येत राहातो. त्यांना मेहनतीचं फळ मिळतं. येणाऱ्या दिवसात भूतकाळात केलेल्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्ट्साठी तुमचे नाव पुढे केले जाऊ शकते. आर्थिक आवक वाढल्यामुळे तुमि कर्जाचा बोजा देखील कमी कराल.
- सिंह- सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. सूर्याच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने भरलेले असते. ते चांगले नेते आहेत आणि नाव-पोस्ट-पैसा भरपूर कमावतात. नोकरीत असणाऱ्या लोकांना लवकरच नोकरीपुरक नवीन काम मिळेल ज्यामुळे त्यांच्या हातात अधिक पैसा येईल. नव्या ओळखीचा फायदा या लोकांना होणार आहे. तुच्या मेहनतीला नशिबाची साथ लाभणार असल्याने कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील.
- वृश्चिक- वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. यामुळे या राशीचे लोक धाडसी आणि निर्भिड असतात. त्यामुळे ते धोका पत्करण्यास घाबरत नाहीत. नवीन काम जोखमीचे असले तरी त्यात तुमचे कुठलेच नुकसान होणार नाही. मेहनत करण्यासाठी तुम्ही कायमच पुढे असता. त्याच मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. तुमचे काम तुम्हाला योग्य संधी मिळवून देईल. आर्थिक चणचण संपून पुन्हा सुखाचे दिवस सुरु झाले आहेत.
- धनु- धनु राशीचा स्वामी गुरु आहे. धनु राशीचे लोक चौकटीबाहेर काम करतात आणि उत्तम यश मिळवतात. त्यांना खूप नशिबाची साथ मिळते. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा येतो. चौकटीच्या बाहेर जाऊन केलेल्या कामामुळे तुम्हाला आणखी यश प्राप्त होणार आहे, नशिबाची साथ मिळणार असून लक्ष्मी मातेचा आशीर्वादही तुमच्यावर असेल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)