Astrology: मार्गी मंगळ ‘या’ राशीच्या लोकांना करणार मालामाल, तुमची रास यात आहे काय?

| Updated on: Jan 22, 2023 | 8:38 PM

ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाला खूप महत्त्व दिले गेले आहे. मंगळ हा इच्छाशक्ती आणि उर्जेचा ग्रह मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीचा मंगळ बलवान असेल तर शुभ परिणाम प्राप्त होतात.

Astrology: मार्गी मंगळ या राशीच्या लोकांना करणार मालामाल, तुमची रास यात आहे काय?
मंगळ मार्गी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. 13 जानेवारी रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ मार्गी (Mars Transit) होत आहे. 13 मार्च रोजी तो मिथुन राशीत प्रवेश करेल, जो बुध राशीचा आहे. मंगळ कोणत्याही एका राशीत 45 दिवस राहतो. पण तो 120 दिवस वृषभ राशीत राहणार आहे. मंगळ 13 नोव्हेंबर 2022 पासून या राशीत आहे आणि 13 मार्च 2023 पर्यंत राहील. यामुळे मंगळ अनेक राशींवर प्रभाव टाकेल. ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाला खूप महत्त्व दिले गेले आहे. मंगळ हा इच्छाशक्ती आणि उर्जेचा ग्रह मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीचा मंगळ बलवान असेल तर तो खूप शक्तिशाली असतो आणि त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतात.

 

मार्गी मंगळाचा कोणावर काय परिणाम होईल ते जाणून घेउया

 

हे सुद्धा वाचा
  1. मेष: मंगळाच्या मार्गामुळे मेष राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. आर्थिक चणचणही दूर होईल. लोकं तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल.
  2. वृषभ: या राशीत मंगळाचे भ्रमण आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सर्वाधीक चांगले दिवस असतील. मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाता येईल. व्यवसायासाठीही वेळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. पण काही गोष्टींवरून भांडण होऊ शकतात.
  3. मिथुन: या राशीच्या लोकांचे शत्रू पराभूत होतील. कोर्टात तुम्हाला विजय मिळू शकतो. जवळचे लोकं तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, मंगळ मार्गात असल्याने धावपळ होईल आणि खर्चही वाढेल.
  4. कर्क: मंगळाच्या मार्गामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. आर्थिक लाभासोबतच तुम्हाला प्रशंसा आणि मान्यता मिळेल. शेअर बाजारातही अनपेक्षित नफा होऊ शकतो. मुलांशी संबंध चांगले राहतील.
  5. सिंह: सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण खूप शुभ असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही वाद सुरू असतील तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधीही मिळेल.
  6. कन्या: मार्गी मंगल कन्या राशीच्या लोकांची चांदी करेल. आर्थिक दृष्ट्या हा काळ खूप छान असणार आहे. या काळात तुमचा व्यवसाय अधिक वाढेल आणि दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा विचार करू शकता.
  7. तूळ: तूळ राशीच्या आठव्या घरात मंगळाचे भ्रमण होईल. हा काळ तुमच्या हिताचा असेल. नशीब बलवान होईल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. कोणत्याही जुन्या आजारापासून मुक्ती मिळू शकते. संशोधन क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ चांगला आहे. ओपल परिधान करणे भाग्यवान असल्याचे सिद्ध होऊ शकते.
  8. वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ खूप शुभ परिणाम घेऊन येईल. तुमचे मन धार्मिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहील. जर तुम्ही नोकरीत बदलाची योजना आखत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांना पैशाच्या बाबतीत सकारात्मक परिणाम मिळतील.
  9. धनु: या काळात वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन वेगळे ठेवा. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या प्रयत्नांना फळ मिळेल. धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा.
  10. मकर: मकर राशीच्या व्यावसायिकांना मंगळाच्या मार्गाने लाभ होईल. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी बढती मिळेल. या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
  11. कुंभ: या राशीच्या राशीच्या लोकांनी आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी धोरणे विकसित करा. वाहन किंवा स्थावर मालमत्तेचे व्यवहार लाभदायक ठरतील.
  12. मीन: परदेश दौर्‍यांचा फायदा होईल. अविवाहित लोकांची जीवनसाथीचा शोध पूर्ण होईल. जोडपे एकमेकांच्या जवळ येतील. लवकरच काही चांगली बातमी मिळू शकते. पदोन्नती किंवा नोकरीच्या संधी मिळू शकतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)