Astrology : मंगळ करणार तुळ राशीत प्रवेश, मेष-वृश्चिक सहित या तीन राशीच्या लोकांना होणार मोठा धनलाभ

| Updated on: Sep 25, 2023 | 12:51 PM

ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार, मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत 03 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:58 वाजता प्रवेश करेल. मंगळ 43 दिवस तूळ राशीत राहील. या वेळी ते अनुक्रमे स्वाती आणि विशाखा नक्षत्रात प्रवेश करतील.

Astrology : मंगळ करणार तुळ राशीत प्रवेश, मेष-वृश्चिक सहित या तीन राशीच्या लोकांना होणार मोठा धनलाभ
मंगळ राशी परिवर्तन
Follow us on

मुंबई : प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर संचार करतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळ ग्रहाला विशेष महत्त्व दिले जाते. मंगळाच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर होतो. 3 ऑक्टोबरला मंगळ तूळ राशीत प्रवेश करेल. मंगळाच्या संक्रमणामुळे अनेक राशींचे भाग्य चमकेल. मंगळ 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 05.12 वाजता तूळ राशीत प्रवेश करेल. सध्या 18 ऑगस्टपासून ग्रहांचा सेनापती कन्या राशीत आहे. मंगळ हा रक्त, युद्ध, वीज आणि तंत्रज्ञान याचा कारक ग्रह मानला जातो. मंगळ हा अग्नि तत्वाचा ग्रह आहे.

ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार, मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत 03 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:58 वाजता प्रवेश करेल. मंगळ 43 दिवस तूळ राशीत राहील. या वेळी ते अनुक्रमे स्वाती आणि विशाखा नक्षत्रात प्रवेश करतील. त्याच वेळी, 16 नोव्हेंबर रोजी ते तूळ राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

या राशीच्या जातकांना होणार लाभ

मेष

मेष राशीवर मंगळाचा विशेष प्रभाव आहे. अशा स्थितीत मंगळाचे संक्रमण त्यांना लाभदायक ठरेल. करोडपती होण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. शेअर मार्केटमधून पैसे मिळतील. नोकरदारांना उच्च पदे आणि पगारासाठी नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचा तणाव दूर होईल. गुंतवणुकीतून लाभ होईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कला, माध्यम, अभिनय, गायन आणि मार्केटिंग या क्षेत्रांशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष शुभ आहे.

हे सुद्धा वाचा

मिथुन

मंगळाच्या संक्रमणाचा शुभ प्रभाव मिथुन राशीवर दिसून येईल. या राशीचे लोक भाग्याच्या बाजूने असतील. व्यवसायात विशेष प्रगती होईल. नोकरीतही सकारात्मक बदल होतील. मंगळाच्या कृपेने वैवाहिक जीवनात आनंद राहील. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या संभाषण शैलीत सुधारणा केल्यास तुम्हाला फायदा होईल. नवीन संधी मिळतील. तुमचे उत्पन्न वाढेल. राजकारणात सक्रिय लोकांसाठी हा सूवर्ण काळ असेल.

मकर

मकर राशीवर मंगळाचा विशेष प्रभाव आहे. या काळात तुम्हाला न्यायालयीन वाद किंवा कोणत्याही प्रकारच्या वादातून दिलासा मिळेल. मंगळाचा राशी बदल आर्थिक बाबतीत चांगला राहील. आदरही वाढेल. आरोग्य सर्वसाधारणपणे चांगले राहील. तुमच्या रोजगाराची साधने वाढतील. नोकरी करणाऱ्यांना पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल. नोकरी बदलण्याचे नियोजन यशस्वी होईल. व्यावसायिकांना चांगली ऑर्डर मिळू शकते. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)