मुंबई : आज बुध मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. बुध हा बुद्धिमत्ता, कौशल्य, तर्क क्षमता, यश, शिकण्याची क्षमता इत्यादींचा कारक आहे. जेव्हा पत्रिकेत बुधाची स्थिती बलवान असते तेव्हा जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते आणि सर्व क्षेत्रात यश मिळते. याउलट पत्रिकेत बुधाची स्थिती कमकुवत असेल तर जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जेव्हा बुध कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम नोकरी आणि व्यवसायावर होतो. काही राशींसाठी बुधाचे संक्रमण (Budh Gochar) फलदायी ठरेल, तर काही राशीच्या लोकांना चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते.
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचा राशी बदल फायदेशीर ठरेल. या दरम्यान जीवनात उत्साह दिसून येईल. यासोबतच वैयक्तिक आयुष्यातही अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे चांगली बातमी मिळेल आणि परदेशातही नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. वृषभ राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या प्रभावामुळे धनप्राप्तीच्या शुभ संधी मिळतील आणि नवीन व्यवसायातही नशिब आजमावू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे असाल. या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या घरी काही कार्यक्रम होऊ शकतात.
बुध तुमच्या राशीमध्ये वरचढ राहून बुधचे हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या दरम्यान, आर्थिक लाभाची चांगली शक्यता असेल आणि तुम्हाला जुन्या आजारांपासून देखील आराम मिळेल. संक्रमण काळात, भावांच्या सहकार्याने गरजा पूर्ण होतील आणि नवीन लोक भेटतील, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होतील. या काळात नोकरदार लोकांच्या पद आणि प्रभावात वाढ होईल आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील. बुधाचे संक्रमण व्यावसायिकांसाठी चांगले राहील, त्यांना कठोर परिश्रम करून पैसे मिळवण्यात यश मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर दोघांमधील संबंध चांगले राहतील आणि नात्यात सामंजस्य राखले गेले आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण सकारात्मक ठरेल. या दरम्यान, नवीन लोकांशी चांगली भेट होईल आणि मैत्री टिकवण्यातही यश मिळेल. तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर हा कालावधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचे तर तुम्हाला उत्साही वाटेल आणि सर्व कामे पूर्ण कराल. लव्ह लाईफमध्ये नशीब तुमची साथ देईल आणि नातेसंबंधांमध्ये प्रेम टिकून राहील. कौटुंबिक सदस्यांना पाहून मन प्रसन्न राहील आणि जोडीदारासोबत मिळून नवीन मालमत्ता खरेदी करू शकाल. या काळात तुम्ही पैशाचा वापर हुशारीने कराल आणि पैशाची बचत करण्यातही तुम्हाला यश मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)