Astrology : मानसिक स्थितीला प्रभावित करतो चंद्र, ज्योतिषशास्त्रात चंद्राचे महत्त्व

| Updated on: Nov 28, 2023 | 12:05 PM

मन आणि भावनांशी थेट संबंध असल्याने, चंद्र आपल्या दैनंदिन जीवनावर, आपल्या वृत्तीवर आणि आपल्या आध्यात्मिक स्थितीवर खोल प्रभाव पाडतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत चंद्र शुभ स्थितीत असतो, तेव्हा तो निरोगी सकारात्मक भावनांसह आनंद, समृद्धी, मुलांचा आनंद, आराम आणि आरोग्य सुधारण्याचा कारक असतो.

Astrology : मानसिक स्थितीला प्रभावित करतो चंद्र, ज्योतिषशास्त्रात चंद्राचे महत्त्व
ज्योतिषशास्त्रात चंद्राचे महत्त्व
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : सूर्याप्रमाणेच, नऊ ग्रहांमध्ये चंद्राचे (Moon in Astrology) प्रमुख स्थान आहे. लोकांच्या जीवनातील अनेक कार्यांसाठी चंद्र जबाबदार आहे. चंद्र कोणत्याही राशीl अडीच दिवस राहतो आणि एक नक्षत्र ओलांडल्यानंतर 24 तासांत दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो. सूर्याप्रमाणे, त्याचा प्रवास नेहमी सरळ राहते, म्हणजेच इतर ग्रहांप्रमाणे, तो कधीही प्रतिगामी दिशेने फिरत नाही. पत्रिकेत चंद्र हा विशेष प्रभावशाली ग्रह मानला जातो. ज्योतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया पत्रिकेत चंद्राचे महत्त्व

पत्रिकेत चंद्राचा कसा परिणाम होतो?

1. ज्याप्रमाणे जन्म पत्रिकेत राशीला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे चंद्रालाही महत्त्व आहे. चंद्राच्या सौंदर्याबद्दल कवींनी अनेक गाणी आणि कविता रचल्या आहेत. चंद्रामध्ये प्रचंड आकर्षण शक्ती आहे. महिलेच्या चंद्र बलवान असेल तर, त्यांना गर्भधारणा होण्यास मदत होते. जेव्हा जेव्हा एखाद्या जोडप्याला एखाद्या ज्योतिषाकडून मुलाच्या जन्माबाबत माहिती मिळवायची असते तेव्हा ते सर्वप्रथम संबंधीत स्त्रीच्या पत्रिकेतील चंद्राच्या स्थितीचा अभ्यास करतात.

2. पत्रिकेत पंचम स्थानावरून कोणत्याही व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे मूल्यांकन केले जाते, परंतु मानसिक स्थितीचा अभ्यास केवळ चंद्राच्या घरातील स्थितीच्या आधारे केला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती जन्म पत्रिकेशीवाय प्रश्न घेऊन ज्योतिषाकडे जाते तेव्हा ज्योतीशी आधी तीची पत्रिका बनवतात, ग्रहांच्या परिस्थितीचा अभ्यास करतात आणि त्याचे आकलन मांडतात. या जन्म पत्रिकेत चंद्राच्या स्थितीच्या आधारे प्रश्नकर्त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज लावला जातो.

हे सुद्धा वाचा

3. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र बलवान बनतो तेव्हा त्याच्यावर भगवंताची विशेष कृपा असते. चंद्र स्वतः चढत्या राशीचा स्वामी होऊन आरोहीवर प्रभाव टाकू शकतो. तिसर्‍या स्थानात, जर कुंडलीतील सर्व ग्रहांपेक्षा चंद्र बलवान असेल तर त्या व्यक्तीला चंद्र प्रबळ म्हणतात. अशा स्थितीत व्यक्तीची मानसिक स्थिती खूप चांगली असते, प्रकृती शांत आणि वाणी गोड असते.

चंद्राला बलवान करण्यासाठी अवश्य करा हे उपाय

पत्रिकेतील स्थितीनुसार चंद्र व्यक्तीच्या भावना, स्वभाव, आरोग्य आणि मानसिक स्थिती याविषयी महत्त्वाची माहिती देतो. जर एखाद्याच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती बिघडली तर राजयोग असूनही तो फलदायी होत नाही. कुंडलीत चंद्र बलवान असणे खूप महत्वाचे आहे. चंद्र मजबूत करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आईची सेवा करणे. सेवेत प्रसन्न होऊन मातेने दिलेल्या आशीर्वादाने चंद्रही प्रसन्न होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)