Astrology: कितीही गरज पडली तरी या पाच गोष्टी कधी घेऊ नका उधार, शास्त्रात दिले आहे कारण

| Updated on: Nov 24, 2022 | 5:06 PM

जोतिषशास्त्रातील काही उपाय प्राचीन काळापासून पाळल्या जात आहेत. यामध्ये काही वस्तू उधार घेणे टाळण्याबद्दल सांगितले आहे.

Astrology: कितीही गरज पडली तरी या पाच गोष्टी कधी घेऊ नका उधार, शास्त्रात दिले आहे कारण
जोतिषशास्त्र
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  कधीकधी आपल्याला लगेच एखाद्या वस्तूची गरज पडते. अशा परिस्थितीत आपण ही वस्तू वापरण्यापुरती  उधार घेतल्यानंतर परत करतो. जीवनात अशा गोष्टींची देवाणघेवाण आवश्यक असते, पण सगळ्याच वस्तूंच्या बाबतीत असे करणे चुकीचे आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology Tips) अशा अनेक गोष्टी आहेत ज्या उधार घेऊ नयेत. अशा गोष्टींमुळे व्यक्तीला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

घड्याळ

काही लोकांना मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून घड्याळ उधार घेण्याची सवय असते. ज्योतिषशास्त्रानुसार काळाचा संबंध व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट काळाशी असतो. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचे घड्याळ घेतो तेव्हा त्याचा वाईट काळही तुमच्यावर येतो. त्यामुळे दुसऱ्याचे घड्याळ वापरणे चुकीचे आहे.

पेन किंवा पेन्सिल

पेन ही एक महत्त्वाची वस्तू आहे. जेव्हा आपल्याकडे पेन्सिल किंवा पेन नसतो तेव्हा आपण न निसंकोचपणे एखाद्याला त्याची मागणी करतो. ज्योतिषशास्त्रानुसार कोणाचीही लेखणी घेणे चुकीचे आहे. यामुळे जीवनाची प्रगती मंदावते. धार्मिक श्रद्धेनुसार चित्रगुप्त जीवनातील अडचणी आणि सुखे आपल्या लेखणीने लिहितात.

हे सुद्धा वाचा

अंगठी

पुरुष आणि स्त्रिया दोघेही अंगठी परिधान करतात. काही लोक अंगठीत रत्नही घालतात. अंगठी कधीही उधार घेऊ नये. असे केल्याने आर्थिक संकट येऊ शकते.

कंगवा

अनेक पुरुष खिशात छोटा कंगवा ठेवतात. तुमचा वापरलेला कंगवा कधीही कुणाला देऊ नका किंवा दुसऱ्याचा वापर करू नका. जोतिषशास्त्रानुसार असे केल्याने तुमच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

कपडे

केवळ ज्योतिषशास्त्रातच नाही तर वैद्यकशास्त्रातही इतरांचे कपडे वापरू नका असे सांगितले आहे. दुसऱ्याचे जुने कपडे घातले तर नशीब साथ देत नाही अशी मान्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)