Astrology : 28 ऑक्टोबर या तीन राशीच्या लोकांसाठी राहाणार अत्यंत खास, चंद्रासारखे चमकणार भाग्य

| Updated on: Oct 20, 2023 | 8:09 AM

Lunar Eclipse 2023 नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी चंद्रग्रहणाच्या वेळी 'ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद-प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीय नमः' या मंत्राचा जप करावा. असे केल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते आणि सन्मानही वाढतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी 'ओम श्रीं ह्रीं क्लीम ऐम ओम स्वाहा' या मंत्राचा जप केल्यास फायदा होईल.

Astrology : 28 ऑक्टोबर या तीन राशीच्या लोकांसाठी राहाणार अत्यंत खास, चंद्रासारखे चमकणार भाग्य
चंद्रग्रहण
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ( Lunar Eclipse) 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) चंद्रग्रहणाचा कालावधी रात्री 11.32 वाजता सुरू होईल. हे वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल, जे भारतात दिसणार आहे. या दिवशी चंद्रग्रहणासोबत राहूचे संक्रमण होणार आहे. सावली ग्रहाच्या प्रभावाने काही राशींना फायदा होईल असे संकेत आहेत. तसेच, चंद्रग्रहणामुळे त्याचा प्रभाव दुप्पट होईल. याशिवाय या राशीच्या लोकांचे अर्धवट कामे पूर्ण होतील. या राशीच्या लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते तर व्यापारी वर्गाला त्यांच्या मेहनतीला यश मिळेल.

या राशीच्या लोकांना होणार सर्वाधीक लाभ

वृषभ

राहूचे संक्रमण वृषभ राशीसाठी खूप शुभ राहील. या काळात तुम्ही नवीन योजना आखण्यात यशस्वी व्हाल. नातेवाईक आणि मित्रांसोबतचे व्यवहार आनंददायी होतील. तुम्हाला कोणत्याही विशेष कामात अपेक्षित यश मिळेल. कर्जाशी संबंधित व्यवहार कोणाशीही करू नका. तुम्हाला जुण्या ओळखीतून फायदा होण्याची शक्यता आहे.

मिथुन

नोकरीत मोठा बदल होईल. विज्ञान आणि संगीताशी संबंधित लोकांना फायदा होईल. संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळेल. नवीन विषयांची माहिती मिळेल. सहलीचा बेत आखता येईल. महिलांना आरोग्याच्या समस्या असतील. अवैध प्रेमप्रकरण उघड होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन साधन मिळू शकते. या राशीच्या लोकांना ऑनलाईल गेमिंगमध्ये लाभ होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

वृश्चिक

राजकारण आणि सामाजिक कार्यात आपला दबदबा कायम ठेवण्यात यशस्वी व्हाल. कर्जमुक्त होण्याची सर्व शक्यता आहे. विद्यार्थी अभ्यासात एकाग्र राहतील. जीवनात नवीन सुरुवात होऊ शकते. दिर्घकालीन अडकलेले पैसे परत मिळतील. समाजात मानसन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद अनुभवाल. एखादा नवीन व्यावसाय सुरू करण्यासाठी योग्य काळ आहे.

ग्रहण काळात हे उपाय करा

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी चंद्रग्रहणाच्या वेळी ‘ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद-प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीय नमः’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते आणि सन्मानही वाढतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी ‘ओम श्रीं ह्रीं क्लीम ऐम ओम स्वाहा’ या मंत्राचा जप केल्यास फायदा होईल.

चंद्रग्रहणानंतर पहिल्या सोमवारी उपवास ठेवा आणि भगवान शिवाची पूजा करा आणि घरी केशर खीर तयार करा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर मुलींना खाऊ घाला. यानंतर पांढरे वस्त्र आणि तांदूळही दान करा. असे केल्याने ग्रहण दोष दूर होतो आणि कुंडलीतील चंद्राची स्थितीही मजबूत होते.

चंद्रग्रहणाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी स्वच्छ भांड्यात पाणी किंवा दूध ओतून उशीजवळ ठेवा आणि झोपी जा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच शनिवारी सकाळी ते झाडाच्या मुळाशी टाकावे. असे केल्याने कुंडलीत ग्रहण योग असल्यास तो दूर होऊन सर्व कामे सहज पूर्ण होतील. जीवनात सकारात्मकता देखील असेल, जी तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल.

जर तुमची दाढी असेल तर चंद्रग्रहणाच्या एक दिवस आधी काढून टाका. म्हणजे ग्रहणाच्या वेळी दाढी करू नये. तसेच ग्रहणाच्या आधी चांदीच्या भांड्यात गंगाजल, तांदूळ, साखर आणि दूध मिसळून चंद्राला अर्घ्य अर्पण करावे आणि ग्रहणकाळात मानसिकरित्या जप, तपश्चर्या आणि दान करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)