मुंबई : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology), नऊ ग्रहांच्या राशी बदलामुळे सर्व राशीच्या जातकांवर परिणाम होतो आणि त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनावरही त्याचा परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार राशी बदलाचा प्रभाव सर्व राशींवर शुभ किंवा अशुभ असू शकतो. 30 मे रोजी रात्री 7.39 मिनिटांनी चंद्र कर्क राशीतून शुक्राचे संक्रमण होणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार शुक्र 7 जुलैपर्यंत कर्क राशीत विराजमान राहील. या दरम्यान, मंगळ आणि शुक्राच्या संयोगामुळे, या राशींना मोठे फायदे मिळतील.
शुक्राचा योग मेष राशीच्या लोकांना भरपूर लाभ देईल. तुम्ही कुटुंबाच्या सुविधांची काळजी घ्याल आणि त्यांच्यासाठी आरामदायी वस्तू खरेदी कराल. अविवाहितांचे लग्न होण्याची शक्यता आहे. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. कोणत्याही प्रकारचा ताण राहणार नाही. मन शांत राहील. आर्थिक लाभ अपेक्षित आहे.
शुक्राचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत करेल. कौटुंबिक सुख लाभेल. करिअरमध्ये प्रगती होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढल्याने जीवनशैली सुधारेल.
कर्क राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे जीवनात अनेक शुभ घटना घडतील. लव्ह लाईफमध्ये सौंदर्य वाढेल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. नोकरीत वरिष्ठ अधिकार्यांशी संबंध दृढ होतील आणि भविष्यात आर्थिक लाभ होण्याची भरपूर शक्यता आहे.
मंगळ आणि शुक्राचा युती कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देईल. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि अविवाहित असाल तर लवकरच जोडीदाराचा शोध पूर्ण होईल. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
शुक्र संक्रमणाच्या प्रभावामुळे मकर राशीच्या लोकांच्या जीवनात शुभ प्रभाव वाढतील आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सुधारतील. तुमच्या जोडीदारासोबत तुमची जवळीक वाढेल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त रोमँटिक व्हाल. तुमच्या व्यवसायात प्रगती होईल आणि नोकरदार लोकांनाही काही चांगल्या संधी मिळतील. मित्रांसोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील. जे व्यवसाय करत आहेत, त्यांच्या कामात वेगाने प्रगती होईल आणि चांगले परिणाम मिळतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)