सूर्य गोचर
Image Credit source: Social Medi
मुंबई : जोतिषशास्त्रात (Astrology) सूर्याला विशेष महत्त्व आहे. सूर्यदेव हा आत्म्याचा कारक मानला जातो. सूर्य एका राशीत 30 दिवस फिरतो. यानंतर तो एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्य सध्या कन्या राशीत असून 18 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश करेल. त्यामुळे 18 ऑक्टोबरला तूळ संक्रांत साजरी केली जाणार आहे. सनातन धर्मात संक्रांतीच्या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, ध्यान आणि दान केले जाते. संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात. यासोबतच निरोगी आयुष्याचे वरदानही मिळते. सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी तूळ संक्रांतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार दान करा.
तुमच्या राशीनुसार करा या गोष्टींचे दान करा
- मेष राशीच्या लोकांनी तूळ संक्रांतीच्या दिवशी गूळ, मसूर आणि लाल मिरचीचे दान करावे. यामुळे मंगळ दोषाचा प्रभाव दूर होतो.
- वृषभ राशीच्या लोकांनी सूर्यदेवाची कृपा मिळविण्यासाठी संक्रांत तिथीला तांदूळ आणि दूध दान करावे.
- मिथुन राशीच्या लोकांनी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी तूळ संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिलांना हिरव्या बांगड्या दान कराव्यात.
- कर्क राशीच्या लोकांनी सूर्याची कृपा मिळवण्यासाठी तुळ संक्रांतीच्या दिवशी पांढरे वस्त्र, दूध, साखर आणि मिठाईचे दान करावे.
- सिंह राशीच्या लोकांनी सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी संक्रांतीच्या तिथीला गूळ आणि मधाचे दान करावे.
- कन्या राशीच्या लोकांनी सूर्यदेवाची कृपा मिळविण्यासाठी तूळ संक्रांतीच्या दिवशी गाईला हिरवे गवत खायला द्यावे.
- तूळ राशीच्या लोकांनी सूर्यदेवाची कृपा मिळविण्यासाठी तूळ संक्रांतीच्या तिथीला पांढरे वस्त्र दान करावे.
- वृश्चिक राशीच्या लोकांनी तुळ संक्रांतीच्या तिथीला सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र दान करावे.
- धनु राशीच्या लोकांनी भगवान भास्करचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केशर दूध, केळी आणि बेसन दान करावे.
- मकर राशीच्या लोकांनी सूर्यदेवाची कृपा मिळविण्यासाठी तूळ संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ दान करावे.
- कुंभ राशीच्या लोकांनी सूर्यदेवाची कृपा मिळविण्यासाठी तूळ संक्रांतीच्या तिथीला ब्लँकेट दान करावे.
- मीन राशीच्या लोकांनी तूळ संक्रांतीच्या दिवशी पिवळी मोहरी, केळी आणि बेसनाचे दान करावे. यामुळे सूर्यदेवाची कृपा अबाधित राहते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)