Astrology : या राशीच्या लोकांना करावा लागू शकतो गृह कलहाचा सामना, वक्री शनि ठरू शकतो त्रासदायक

| Updated on: Jul 06, 2023 | 1:26 PM

या राशीच्या लोकांना कौटुंबिक कलहाचा सामना करावा लागेल, म्हणून अगोदरच सावध रहा. मतभेद होईल अशा चर्चांना बगल द्या. सुतावरून स्वर्ग गाठू नका.

Astrology : या राशीच्या लोकांना करावा लागू शकतो गृह कलहाचा सामना, वक्री शनि ठरू शकतो त्रासदायक
शनिदेव उपाय
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : शनिदेवाची बदलती चाल सर्व राशीच्या लोकांसाठी खूप महत्वाची आहे, कारण वैदिक ज्योतिष शास्त्रात (Astrology) शनि हा एक अत्यंत महत्वाचा ग्रह मानला जातो. जेव्हा जेव्हा त्याच्या हालचाली बदलतात तेव्हा सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. जूनमध्ये शनिदेव प्रतिगामी झाले आहेत. अशा परिस्थितीत, काही राशींच्या जातकांना प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. पती-पत्नीमध्ये मतभेद आणि कुटूंबातील इतर सदस्यांमध्ये वादाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते.  जाणून घेऊया कोणत्या राशीच्या जातकांसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे.

या राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी

कर्क

कर्क राशीच्या लोकांना कौटुंबिक कलहाचा सामना करावा लागेल, म्हणून अगोदरच सावध रहा. मतभेद होईल अशा चर्चांना बगल द्या. सुतावरून स्वर्ग गाठू नका. भाऊ-भावाच्या कुटुंबातही मतभेद होऊ शकतात, त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले. तुम्ही जमीन खरेदी करण्याचा किंवा भविष्यातील कोणत्याही नियोजनासाठी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर कुटुंबाची संमती आवश्यक आहे. सासरच्या मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांनी आपल्या वैवाहिक जीवनात तणाव नसावा याची काळजी घ्यावी, कारण यावेळी जोडीदारासोबत वाद होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्याकडून उद्धटपणा होणार नाही याची काळजी घ्या. घटस्फोटाच्या खटल्याचा सामना करणाऱ्यांसाठी नाते सुधारण्याची ही शेवटची संधी आहे. संबंध सुधारण्यास वाव असेल तर ही वेळ योग्य राहील. खूप संयमाने काम करावे लागेल. प्रतिकूल परिस्थितीत कसे वागावे याचे भान ठेवावे लागते. शनिदेव तुम्हाला हे शिकण्याची संधी देतील. परदेशात राहणार्‍या नातेवाईकांनाही त्यांचा फायदा होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)