Astrology: ‘या’ राशींचे लोकं असतात शिग्रकोपी; रागामुळे करून घेतात स्वतःचेच नुकसान

| Updated on: Jun 13, 2022 | 6:10 PM

जोतिष्यशास्त्रानुसार (Astrology)प्रत्येक राशीचा स्वभाव वेगवेगळा असतो. यामागे त्या राशीच्या स्वामीग्रहाचा परिणाम असतो. जसा ग्रहांचा स्वभाव तसाच त्या राशीच्या लोकांचा स्वभाव असतो. एखादा ग्रह शांत असतो तर एखादा तापट(Angry). आज आपण अशाच काही राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा स्वामीग्रह उग्र किंवा तापट असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या राशीवर आणि स्वभावावर होतो.  त्या राशींशी संबंधित व्यक्तीही जन्मापासूनच रागीट […]

Astrology: या राशींचे लोकं असतात शिग्रकोपी; रागामुळे करून घेतात स्वतःचेच नुकसान
Follow us on

जोतिष्यशास्त्रानुसार (Astrology)प्रत्येक राशीचा स्वभाव वेगवेगळा असतो. यामागे त्या राशीच्या स्वामीग्रहाचा परिणाम असतो. जसा ग्रहांचा स्वभाव तसाच त्या राशीच्या लोकांचा स्वभाव असतो. एखादा ग्रह शांत असतो तर एखादा तापट(Angry). आज आपण अशाच काही राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा स्वामीग्रह उग्र किंवा तापट असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या राशीवर आणि स्वभावावर होतो.  त्या राशींशी संबंधित व्यक्तीही जन्मापासूनच रागीट स्वभावाच्या असल्याचे पाहायला मिळते. या सवयींवर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर हा राग इतका वाढतो की, त्यामुळे माणूस स्वतःचेच नुकसान करून घेतो.

मेष

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा ग्रहांचा सेनापती आहे, असे म्हटले जाते. हा अग्निमय स्वभावाचा ग्रह आहे, त्यामुळे मेष राशीच्या लोकांच्या स्वभावात क्रोध असतो. मंगळ हे शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जाते. या कारणास्तव मेष राशीचे लोक देखील खूप धैर्यवान असतात. ते कोणतेही काम करण्यास घाबरत नाहीत. हे लोक अहंकाराच्या जोरावर छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागावतात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा राग आला तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते.

सिंह

सिंह हे अग्नीच्या तत्वाचे चिन्ह आहे आणि त्याचा स्वामी सूर्य आहे. तसे, हे लोक सूर्यासारखे तेजस्वी आहेत आणि ते राजासारखे मुक्त मनाचे आहेत. ते कुठेही गेले तरी त्यांचा प्रभाव फार लवकर निर्माण करतात. मात्र, त्यांच्यात आत प्रचंड राग असतो. रागामुळे ते कधी-कधी स्वतःचेही नुकसान करतात. त्यांना एखाद्या व्यक्तीचा कधी आणि कोणत्या गोष्टीवरून राग येईल हे सांगता येत नाही.

धनु

धनु राशीचा स्वामी गुरू असल्यामुळे हे लोक खूप हुशार असतात आणि त्यांचा शिक्षणाकडे जास्त कल असतो. त्यांना काहीतरी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते, त्यामुळे ते आयुष्यभर काहीतरी शिकत राहतात आणि इतरांना ज्ञान देत राहतात. पण त्यांची राशी अग्नी तत्वाची असल्याने त्यांच्यात रागही खूप असतो. एकदा का त्यांना एखाद्या गोष्टीवर राग आला की त्यांना पटवणे सोपे नसते. हुशार असल्याने त्यांच्याकडे तार्किक शक्तीही प्रचंड असते. अशा परिस्थितीत ते समोरच्या व्यक्तीला सत्य समजावून सांगण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रागामुळे हे लोक कधीकधी स्वतःचे नाते बिघडवतात.

वृश्चिक

वृश्चिक राशीचा स्वामीही मंगळ आहे. या राशीच्या लोकांना आदर खूप प्रिय असतो. सन्मान मिळवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. जर कोणी त्यांचा सन्मान-स्वाभिमान दुखावला तर ते रागाच्या भरात कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे लोक कुणावर चिडले तरच धडा शिकवून सुटकेचा नि:श्वास सोडतात. या दरम्यान अनेक वेळा ते स्वतःचे नुकसानही करतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)