आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकं असतात जे दुसऱ्यांना चुना लावण्यात म्हणजेच ठगबाजी (swindle) करण्यात एक्सपर्ट असतात. असे लोकं कित्तेकांसाठी डोकेदुखी ठरत असतात. गोड बोलून स्वतःचे काम काढून घ्यायचे आणि स्वतःची मदत करण्याची वेळ आली की, पाठ फिरवायची. असे लोकं अनेकदा आपल्या मित्रपरिवारात असतात. आचार्य चाणक्य (Canakya) म्हणतात की खरा मित्र संकटकाळात ओळखला जातो. मित्र तोच असतो जो सुख-दुःखात सोबत असतो. जोतिष्यशास्त्रात असे काही राशी सांगण्यात आल्या आहेत ज्या राशीचे लोकं गोड बोलून स्वतःचे काम करून घेतात. जाणून घेऊया अशाच काही राशींबद्दल.
- वृषभ राशी – या राशीवर शुक्र ग्रहाचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला लग्जरी जीवनाचा कारक मानला जातो. शुक्राच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांची मित्र-मंडळी खूप असते. त्यांच्याकडे इतरांना आकर्षित करण्याची विशेष कला आहे. त्याच्या बोलण्याने आणि जीवनशैलीने प्रभावित होऊन प्रत्येकाला त्यांच्या जवळ यावेसे वाटते. हे लोकं स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापर करण्यात पटाईत असतात.
- कुंभ राशी- कुंभ राशीचे लोकं महत्वकांक्षी असतात. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते कुठल्याही थराला जातात. कधी कधी ते चुकीचा मार्गही स्वीकारतात. यामुळे त्यांच्या संपर्कातले लोकं त्यांच्या कुकृत्याला बळी पडतात. या राशीचे लोकं त्यांच्या वैयक्तिक हितासाठी एखाद्याला चुना लावायला मागेपुढे पाहत नाही.
- सिंह राशी- या राशीच्या लोकांना सत्ता प्रिय असते. स्वतःचे अधिकार कायम ठेवण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. यासाठी ते एखाद्याचा गैरवापर करण्यात पटाईत असतात. दुसऱ्यांच्या खांदयावर बंदूक ठेऊन काम करण्यात ते पटाईत असतात. त्यांच्या अति महत्वकांक्षी स्वभावामुळे ते गोड गोड बोलून इतरांना चुना लावतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)